शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र एन्ट्री

By admin | Updated: January 11, 2017 00:26 IST

नूतनीकरणाची कामे : अधिकाऱ्यांचीच दिशाभूल; कॅन्टीनलाही दाखविला ठेंगा

संदीप भालेराव : नाशिक
अकरा महिन्यांपूर्वी विद्यापीठात दाखल झालेल्या कुलगुरूंनी नवीकोरी गाडी खरेदी केल्यानंतर आता कुलगुरूंच्या गाडीसाठी स्वतंत्र मार्ग तयार करण्याचे काम विद्यापीठात सध्या सुरू आहे. यासाठी या मार्गावरील कॅन्टीन बंद करून विद्यापीठाच्या मागील बाजूस कॅन्टीन स्थलांतरित करण्यात आली आहे.  नवा गडी नवा राज याप्रमाणे शासकीय अधिकारी बदलीच्या ठिकाणी अनेक बदल करीत असतात. त्यास कुलगुरू म्हैसेकर हेदेखील अपवाद ठरलेले नाही. शासकीय शिस्तीला प्राधान्य देणारे आणि वाणीपेक्षा कागदाला महत्त्व देणारे अधिकारी म्हणून त्यांची अल्पावधीतच विद्यापीठात ओळख झाली. त्यामुळे बोलण्यापेक्षा काहीतरी करून दाखविणाऱ्या कुलगुरूंनी फारशी चर्चा होऊ न देता नवी गाडी मिळवून त्यासाठी व्यवस्थापन परिषदेकडून जादा खर्चाची तरतूदही करवून घेतली. त्यासोबत अन्य तीन गाड्यादेखील मंजूर करण्यात आलेल्या आहेत. तत्कालीन कुलगुरुंच्या वाहनांवरील खर्चाचाबाबत आक्षेप घेण्यात आला होता. तसा आक्षेप मात्र विद्यमान कुलगुरुंबाबत कोणीही घेतला नाही. शासकीय दरबारी वजन असल्यामुळे कुलगुरूंबाबत विद्यापीठात कोणताही विरोधाचा सूर निघाला नसल्याचे समजते. त्यातच प्रभारी कुलसचिव हेदेखील कुलगुरूंच्या जवळचे मानले जात असल्याने कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र मार्गाला कोणताही अडसर आला नाही. याउलट सर्वांसाठी सोयिस्कर अशी कॅन्टीन येथून हटविण्यात आली आहे. कॅन्टीनमध्ये कर्मचारी जास्त वेळ जाऊन बसतात म्हणून कॅन्टीन हटविण्यात आल्याचे कारण पुढे करण्यात आले होते. नंतर मात्र कुलगुरूंच्या वाहनासाठी स्वतंत्र मार्गात कॅन्टीनचा काही भाग येणार असल्याने यात थोडेफार बदल केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.  विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या या मार्गावर सध्या पेव्हर ब्लॉक टाकण्याचे काम पूर्णत्वास येत आहे. कुलगुरू या नव्या मार्गाने विद्यापीठात येतील आणि जुन्या मार्गाने बाहेर पडतील, अशी नवी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आहे. असे करण्यामागे कोणतेही विशेष असे कारण नाही, मात्र शासकीय इमारतीमध्ये अशा प्रकारची व्यवस्था असते तीच व्यवस्था येथेही असावी, असा या मागचा अट्टहास असल्याचे खासगीत बोलले जात आहे.