शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहावीपर्यंत मोफत ई-लर्निंग ;   विनोद तावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 01:13 IST

पन्नास वर्षे पूर्ण करणाºया बालभारतीचे नाव बदलणार नाही. तसेच बदलत्या काळानुसार ई-बालभारती करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. इतकेच नव्हे तर राज्यभरातील १ लाख ६ हजार शाळांमध्ये मोफत ई-लर्निंगची व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोेद तावडे यांनी केली.

नाशिक : पन्नास वर्षे पूर्ण करणाºया बालभारतीचे नाव बदलणार नाही. तसेच बदलत्या काळानुसार ई-बालभारती करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत. इतकेच नव्हे तर राज्यभरातील १ लाख ६ हजार शाळांमध्ये मोफत ई-लर्निंगची व्यवस्था करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोेद तावडे यांनी केली.  नाशिक येथील गुरूगोविंद सिंग महाविद्यालयात बालभारतीच्या सुवर्णमहोत्सवाची सांगता व अंबड येथील नवीन इमारतीचे उद्घाटन डिजिटल तंत्रज्ञानाने विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बालभारतीचे संचालक सुनील मगर, आमदार सीमा हिरे, जयंत जाधव, गुरू गोविंद सिंग महाविद्यालयाचे गुरूदेवसिंग बिरदी, बालभारतीच्या सुजाता काळभोर आदी उपस्थित होते. विनोद तावडे यांनी सांगितले की, बदलत्या काळानुसार बालभारतीने बदल आत्मसात केले आहे. पन्नास वर्षांच्या वाटचालीत बालभारतीने अभ्यासक्रमात आवश्यक ते बदल केले. विद्यार्थ्यांच्या आणि नागरिकांच्या जडणघडणीत बालभारतीचा मोठा वाटा आहे. आता बालभारतीच्या पुस्तकातील कविता व गणिते शब्दाचा आशय व खोली ठेवून गाण्यांच्या स्वरूपात सादर करण्याचा  प्रयत्न गायक स्वप्नील बांदोडकर यांच्या माध्यमातून करण्याचा प्रयोेग सुरू केला आहे. १९८० सालीच जगभर स्वीकारण्यात आलेली ज्ञानरचनेवर आधारित अभ्यासक्रम बालभारतीने तयार करण्याच्या सूचना बालभारतीचे अध्यक्ष म्हणून आपण दिल्या आहेत. एका उद्योेजकाने राज्यभरातील १ लाख ६ हजार शाळा मोफत डिजिटल करण्याची तयारी दर्शविली असून, पुढील वर्षापासून पहिली ते दहावीपर्यंतचा अभ्यासक्रम ई-लर्निंगवर आधारित राबविण्यास प्रायोगिक तत्त्वावर सुरू करणार असल्याची घोषणा यावेळी विनोद तावडे यांनी केली.  प्रास्ताविकात सुनील मगर यांनी बालभारतीच्या पन्नास वर्षांतील वाटचालीचा आढावा सादर केला तर उपस्थितांचे आभार विवेक गोसावी यांनी मानले. वेतनवाढीची घोषणा बालभारतीच्या वाटचालीत महत्त्वाचे योगदान देणाºया सेवानिवृत्त व विद्यमान कर्मचाºयांना बक्षीस यावेळी विनोद तावडे यांनी जाहीर केले. विद्यमान कर्मचारी व अधिकारी यांना एका महिन्याची वेतनवाढ तर सेवानिवृत्तांना दहा हजार रुपये देण्याची घोषणा त्यांनी केली.

टॅग्स :SchoolशाळाVinod Tawdeविनोद तावडे