शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूक करणाऱ्या ग्रुपचे फुटले पेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 00:14 IST

कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे जगभरात निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाचा काही समाजकंटकांकडून आर्थिक स्वार्थासाठी गैरफायदा घेतला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप तयार करून असे संधीसाधू नागरिकांना आर्थिक मदतीसाठी भावनिक आवाहन करीत फसवणूक करीत असून, सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत अशा फसवणूक करणाºया ग्रुपचे पेव फुटले आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री सहायता कोशातच मदत करा : कोरोनाच्या संकटातही संधिसाधूपणा

नाशिक : कोरोना व्हायरसच्या फैलावामुळे जगभरात निर्माण झालेल्या दहशतीच्या वातावरणाचा काही समाजकंटकांकडून आर्थिक स्वार्थासाठी गैरफायदा घेतला जात आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे ग्रुप तयार करून असे संधीसाधू नागरिकांना आर्थिक मदतीसाठी भावनिक आवाहन करीत फसवणूक करीत असून, सध्या कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत अशा फसवणूक करणाºया ग्रुपचे पेव फुटले आहे.जगभरात एकीकडे कोरोना व्हायरसचा फैलाव होत असताना दुसरीकडे काही समाजकंटक या संकटाच्या परिस्थितीत सोशल मीडियावर वेगवेगळे ग्रुप तयार करून त्यांच्या लिंक शेअर करून सदस्यसंख्या वाढविण्यासोबतच या संकटाच्या काळात मदतीचा बहाणा करून मोबाइल अ‍ॅप, बँकेच्या खाते क्रमांकावर आॅनलाइन आर्थिक मदत मागवून आर्थिक स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनी सजगता बाळगून कोरोनाविरोधातील लढाईसाठी मुख्यमंत्री सहायता कोशातच आर्थिक मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोनाच्या भीषण परिस्थितीचा सामना करण्यासाठी विविध सेवाभावी संस्था कार्यरत आहेत. यातील बहुतांशी संस्था स्वमालकीच्या साधनांचा वापर करून वंचित, दुर्बल घटकांसाठी खाद्यपदार्थ पुरविण्यासारख्या सेवा देत आहेत. असे करताना त्यांच्याकडून सोशल डिस्टन्सीचेही पालन केले जाते. परंतु काही ग्रुप केवळ एकत्र येऊन फोटोसेशन करीत सोशल मीडियावर दिखाऊपणा करीत आर्थिक मदतीचे आवाहन करीत आहेत. त्यांच्याकडून कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक खबरदारीही घेतली जात नाही. त्यामुळे त्यांच्यापासून संसर्ग वाढण्याचाच धोका अधिक संभवतो. अशा समाजकंटकांपासून सेवाभावातून देणगी देणाºया नागरिकांनी सावधानता बाळगत जी आर्थिक अथवा अन्य स्वरूपाची मदत करण्याची इच्छा आहे ती शासकीय यंत्रणेला उपलब्ध करून देणे गरजेचे बनले आहे.शासकीय यंत्रणांची घ्या मदतकोरोनाच्या संकटाचा गैरफायदा घेत काही संधीसाधू एकत्र येत त्यांच्याकडून आरोग्यसेवा व गरीब गरजूंसाठी वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जात असल्याचे भासविले जाते. तसे भावनिक संदेशही व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टष्ट्वीटर, टिकटॉक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल माध्यमातून व्हायरल केले जातात. यात संबंधितांचे बँक खात्याशी संलग्न मोबाइल क्रमांकही प्रसिद्ध केले जातात. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांच्याकडे कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसते. त्यामुळे आपल्या मदतीचा कोणीही गैरफायदा घेऊ नये व केलेली मदत गरजवंतांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणेची मदत घेण्याची गरज निर्माण झाली आहे.प्रशासनाकडून मदतकार्यात कार्यरत एनजीओ तसेच स्वयंसेवी दानशूर व्यक्तींनी त्यांची नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी समाजाच्या मदतीसाठी पुढे येणे आवश्यक असले तरी अशाप्रकारे समाजसेवेत सहभागी होताना प्रत्येक संस्था तथा व्यक्तींनी त्यांची नोंदणी करणे अनिवार्य असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्णातील दानशूर व्यक्ती व संस्था यांच्या कामकाजात सुसूत्रता यावी यासाठी जिल्हा प्रशासनाने एक गुगल स्प्रेडशीट तयार केले आहे. यात दानशूर व्यक्ती व संस्था लॉगिन करून आपली नोंदणी करू शकतील. दानशूर व्यक्तींची नोंदणी एकाच ठिकाणी व्हावी, त्याची पुनरुक्ती होऊ नये यासाठी डिजिटल स्वरूपात गुगल स्प्रेडशीटचा उपयोग करण्यात येत आहे. यात व्यक्ती, संस्था, मोबाइल क्रमांक, ई-मेल, मदतीचे स्वरूप, वस्तूंचा तपशील, संख्या, ज्या ठिकाणी मदत करावयाची आहे ते ठिकाण, तालुका व मदत पोहोच करण्याची तारीख आपल्या अभिप्रायासह नमूद करावयाची आहे.- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSocial Mediaसोशल मीडिया