शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

सोशल साईट्‌सवरून फसवणूक; लासलगाव पोलिसांकडून जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 00:28 IST

लासलगाव : सोशल साईटस‌्वरून आर्थिक फसवणुकीबरोबरच फेक अकाउंटच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचे प्रकार वाढू लागल्याने लासलगाव पोलिसांनी यबाबत जनजागृती अभियान सुरू केले असल्याची माहिती लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे.

ठळक मुद्देवाढते प्रकार : सावधानता बाळगण्याचे आवाहन

सोशल माध्यमाद्वारे फसवणुकीचे वाढते प्रकार आता ग्रामीण भागातही होऊ लागले आहेत. ओझर येथील एचएएलमध्ये अशाच प्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाची संरक्षणविषयक माहिती पाकिस्तानातील गुप्तहेर संघटनेने मिळविल्याचे प्रकरण ताजे आहे. याशिवाय, एजन्सीच्या माध्यमातून व्यवसायाची संधी आहे, असे सांगून नवागतांना फसवण्याची नवी पद्धत समोर आली आहे. विंचूर येथे एका कंपनीच्या एजन्सीचे आमिष दाखवून ऑनलाइन पद्धतीने रक्कम घेऊन फसवणूक केल्याचे उघड झाले. सदर कंपनीच बनावट असल्याचे लक्षात आल्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. जुन्या वस्तू खरेदीबरोबरच आता थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने फेक अकाउंटचा वापर करून बदली झालेल्या अधिकाऱ्यांच्या मित्र परिवाराकडून उसनी रक्कम ट्रान्सफर करण्याचा प्रकारही विंचूर येथे घडला आहे. कांदा व धान्य व्यापारामुळे लासलगाव, पिंपळगाव बसवंत व विंचूर भागात कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यामुळे या भागात फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यासाठीच लासलगाव पोलिसांनी त्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे.एटीएमसंदर्भात मोबाइलवर विचारणा करून फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण भरपूर आहे. तसेच हनी ट्रॅपमध्ये अडकवत लुटण्याचे प्रकार ग्रामीण भागात घडू लागले आहेत. त्यामुळे महिला व युवतींनी देखील कोणत्याही फायद्याच्या आमिषाला बळी पडू नये. कोणताही व्यवहार करताना सावधानता बाळगावी.- राहुल वाघ, सहायक पोलीस निरीक्षक, लासलगाव

टॅग्स :NashikनाशिकSocial Mediaसोशल मीडिया