शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

सोशल साईटस‌्वरुन फसवणूक; लासलगाव पोलिसांकडून जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:03 IST

वाढते प्रकार : सावधानता बाळगण्याचे आवाहन

ठळक मुद्देहनी ट्रॅप मध्ये अडकवत लुटण्याचे प्रकार ग्रामीण भागात

लासलगाव : सोशल साईटस‌्वरून आर्थिक फसवणुकीबरोबरच फेक अकाऊंटच्या माध्यमातून हनी ट्रॅपमध्ये अडकविण्याचे प्रकार वाढू लागल्याने लासलगाव पोलिसांनी यबाबत जनजागृती अभियान सुरु केले असल्याची माहिती लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी दिली आहे.सोशल माध्यमाद्वारे फसवणुकीचे वाढते प्रकार आता ग्रामीण भागातही होऊ लागले आहेत. ओझर येथील एचएएलमध्ये अशाच प्रकारे हनी ट्रॅपमध्ये अडकवून देशाची संरक्षणविषयक माहिती पाकिस्तानातील गुप्तहेर संघटनेने मिळविल्याचे प्रकरण ताजे आहे. याशिवाय, एजन्सीच्या माध्यमातुन व्यवसायाची संधी आहे असे सांगून नवागतांना फसवण्याची नवी पध्दत समोर आली आहे. विंचुर येथे एका कंपनीच्या एजन्सीचे आमीष दाखवुन ऑनलाईन पध्दतीने रक्कम घेऊन फसवणुक केल्याचे उघड झाले. सदर कंपनीच बनावट असल्याचे लक्षात आल्यावर गुन्हाही दाखल झाला आहे. जुन्या वस्तु खरेदीबरोबरच आता थेट पोलिस अधिकारी यांच्या नावाने फेक अकाऊंटचा वापर करून बदली झालेल्या अधिकारी यांच्या मित्र परीवाराकडून उसनी रक्कम ट्रान्सफर करण्याचा प्रकारही विंचुर येथे घडला आहे. कांदा व धान्य व्यापारामुळे लासलगाव ,पिंपळगाव बसवंत व विंचुर भागात कोट्यवधींची उलाढाल होत असते. त्यामुळे या भागात फसवणुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यासाठीच लासलगाव पोलीसांनी त्याबाबत जनजागृतीची मोहीम हाती घेतली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकSocial Mediaसोशल मीडिया