शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

नांदगावी एक कोटी पंधरा लाखांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 22:28 IST

नांदगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याचा वादा करून एक कोटी पंधरा लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात येथील हनुमाननगरमधील सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश सूर्यवंशी याला पोलिसांनी गुरूवारी अटक केली. फिर्यादी चेतन शिवाजी इघे (रा. नांदगाव), व इतर साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून मध्य रेल्वे विभागात तिकीट तपासणीस (टी.सी.) व गेटमन पदावर नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट सही व शिक्के असलेले बनावट नियुक्ती पत्र, वैद्यकीय तपासणीचा फार्स करून बनावट मेडिकल सर्टिफिकेट देऊन फिर्यादी व इतरांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देसायबर कॅफेचालकास अटक : रेल्वेत नोकरी लावण्याच्या नावाखाली गंडा

नांदगाव : रेल्वेत नोकरी लावून देण्याचा वादा करून एक कोटी पंधरा लाख रुपयांच्या फसवणूक प्रकरणात येथील हनुमाननगरमधील सायबर कॅफेचा संचालक ज्ञानेश सूर्यवंशी याला पोलिसांनी गुरूवारी अटक केली. फिर्यादी चेतन शिवाजी इघे (रा. नांदगाव), व इतर साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून मध्य रेल्वे विभागात तिकीट तपासणीस (टी.सी.) व गेटमन पदावर नोकरीस लावून देण्याचे आमिष दाखवून बनावट सही व शिक्के असलेले बनावट नियुक्ती पत्र, वैद्यकीय तपासणीचा फार्स करून बनावट मेडिकल सर्टिफिकेट देऊन फिर्यादी व इतरांची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील फिर्यादी व साक्षीदार हे रेल्वे व इतर भरतीचे ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी ज्ञानेश नथू सूर्यवंशी, (रा.पवननगर, सोयगाव, ता. मालेगाव) याचे हनुमाननगर नांदगाव येथे असलेल्या सायबर कॅफेवर जात असे. त्यावेळी आरोपी ज्ञानेश सूर्यवंशी याने फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करून तुम्ही ऑनलाईन फॉर्म कशाला भरता.... मी तुम्हाला रेल्वेमध्ये नोकरीस लावतो, असे सांगून टी.सी. पदासाठी १५ लाख रुपये व गेटमन पदासाठी १२ लाख रुपये लागतील, असे सांगून फिर्यादी व साक्षीदार यांची यातील सहआरोपी सतीश गुंडू बुच्चे (रा. घर नं. ९, सद्गुरू हाईटस्, पुणे, ता. जि. पुणे), संतोष शंकरराव पाटील (रा. वंडरसिटी, कात्रज, ता. जि. पुणे) यांचेशी ओळख करून दिली. त्यानंतर आरोपींनी बनावट सही व शिक्के असलेले नियुक्ती पत्र व सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल, भायखळा, मुंबई , बॉम्बे हॉस्पिटल, मुंबई आणि राणी मुखर्जी हॉस्पिटल उत्तर रेल्वे दिल्ली या ठिकाणी मेडिकल झाले. त्याबाबतचे बनावट सही व शिक्के असलेले मेडिकल सर्टिफिकेट देऊन यातील फिर्यादी व साक्षीदारांचेकडून रक्कम घेतल्याची फिर्याद आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या सूचनांनुसार नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सपोनि ईश्वर पाटील, पोहवा भारत कांदळकर, पोना अनिल शेरेकर, सुनील कुऱ्हाडे, सागर कुमावत, पोकॉ संदीप मुंढे यांचे पथकाने सदर कारवाई केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी