शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक अकाउंट हॅक करून फसवणुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 15:42 IST

देवळा : मी आजारी असून हॉस्पिटलमध्ये भरती छालो आहे, उपचारासाठी मला पैशांची गरज आहे, किंवा मला तातडीने पैशांची गरज असून माझ्या खात्यात त्वरित पैसे टाका, असा संदेश फेसबुक प्रोफाइल हॅक करून आपले मित्र आणि नातेवाइकांना येतो. मित्र आणि नातेवाईक त्वरीत दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे टाकतात व नंतर फसवणुक झाल्याचे लक्षात येते. देवळा तालुक्यात अशा प्रकारे सायबर हॅकर्सकडून अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून आतापर्यंत अनेक नागरीकांना मनस्ताप भोगावा लागला आहे.

ठळक मुद्देदेवळा तालुक्यातील घटनात वाढ : नागरीकांना मनस्ताप

देवळा : मी आजारी असून हॉस्पिटलमध्ये भरती छालो आहे, उपचारासाठी मला पैशांची गरज आहे, किंवा मला तातडीने पैशांची गरज असून माझ्या खात्यात त्वरित पैसे टाका, असा संदेश फेसबुक प्रोफाइल हॅक करून आपले मित्र आणि नातेवाइकांना येतो. मित्र आणि नातेवाईक त्वरीत दिलेल्या खाते क्रमांकावर पैसे टाकतात व नंतर फसवणुक झाल्याचे लक्षात येते. देवळा तालुक्यात अशा प्रकारे सायबर हॅकर्सकडून अनेकांचे फेसबुक प्रोफाईल हॅक करण्यात आल्याच्या अनेक घटना समोर आल्या असून आतापर्यंत अनेक नागरीकांना मनस्ताप भोगावा लागला आहे.फेसबुक आयडी हॅक झाल्याचा अनुभव देवळा येथील व्यापारी कौतिक पवार,अतुल आहेर, मुख्याध्यापक चंद्रकांत आहेर, नितिन गुंजाळ आदींना आला आहे. अतुल आहेर यांचे फेसबुक आयडी हॅक करून त्यांच्या नातेवाईक आणि अनेक मित्रांना संदेश पाठवण्यात आले. अतुल आहेर हे दवाखान्यात ॲडमीट असून त्यांना १० ते २० हजार रूपयांची मदत करा, असा उल्लेख मेसेजमध्ये करण्यात आला होता. दुदैवाने त्यांच्या नाशिक मधील एका मित्राने फारशी चौकशी न करता त्वरीत ३ हजार रूपये हॅकर्सने सांगितलेल्या अकाऊंटमध्ये फोन पेनेद्वारे टाकून दिले व नंतर अतुल आहेर यांच्या प्रकृतिची चौकशी करण्यासाठी संपर्क साधला असता फसवणुक झाल्याचे निदर्शनास आले.दुसऱ्या एका मित्राने ८ हजार रूपये अकाऊंटला टाकले परंतु तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे त्यांचे पैसे वाचले. नंतर अतुल आहेर यांनी खुलासा केला कि ते हॉस्पीटलमध्ये दाखल नसून त्यांनी फेसबूकवरून कोणतीही मदत मागितलेली नाही. यानंतर त्यांनी एक पोस्ट करून आपल्या मित्रांना झालेल्या प्रकाराबाबत माहिती दिली.यानंतर आहेर यांनी देवळा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलिसांना संपूर्ण माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्यांना फेसबुक आयडी लॉग आऊट करून मित्रांना माहिती देण्याचा सल्ला दिला.प्रतिष्ठित व्यक्तींचे फेसबुक अकाउंट हॅक करून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. नागरिकांना फेसबुकवरुन विविध कारणे सांगून पैशाची मागणी झाल्यास त्याला कोणीही प्रतिसाद देऊ नका.संबंधित व्यक्तीला फोन करून विचारूनच पैशाचा व्यवहार करा. माझे फेसबुक अकाउंट हॅक झाल्यानंतर मी सायबर क्राईमकडे ऑनलाईन तक्रार दिली आहे.- कौतिक पवार,व्यापारी,देवळा.माझे अकाउंट हॅक झाल्याची बाब मित्रांना समजल्यामुळे हॅकरने केलेल्या पैशांच्या मागणीला कोणीही प्रतिसाद दिला नाही. दुसऱ्या दिवशी हॅकरने बनावट व्हाटस अप अकाउंटला माझा फोटो डिपीला लाऊन पुन्हा एका मित्राकडे पैशाची मागणी केली, परंतु मित्राला घडलेल्या प्रकाराची कल्पना असल्यामुळे फसवणुक टळली. पैसे पाठवतांना योग्य ती खबरदारी घ्यावी.- अतुल आहेर ( शेतकरी, देवळा ) (१६ फेसबुक)

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस