शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

फूलबाजारात सुगंधाचा दरवळ महागला ; नवरात्रोत्सवात मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 22:03 IST

 नाशिक शहरात गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १२५० ते १५० रुपये जाळीने विकला जात असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ होण्याची शक्यचा फूलविक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे नाशकात नवरात्रोत्सवामुळे फुलांना वाढली मागणी मागणीच्या तुलनेत आवक नसल्याने भाव वधारले परतीचा पावसाच्या फटक्यामुळे फुलांची आवक घटली

 नाशिक : गणेशोत्सवानंतर आलेल्या नवरात्रोत्सवात नवदुर्गांच्या पूजेसाठी व गृहसजावटीसाठी सुगंधी फुलांना भाविकांनी पसंती दिल्याने बाजारातील मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने फुलांचे भाव वधारल्याने फूलबाजारातील सुगंधाचा दरवळ महागला आहे. नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच झेंडूच्या फुलांना मागणीत वाढ झाल्याने किरकोळ बाजारात झेंडू ३४ ते ४० रुपये शेकड्याने तर घाऊक बाजारात १२५० ते १५० रुपये जाळीने विकला जात असून, दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर यात आणखी वाढ होण्याची शक्यचा फूलविक्रेत्यांकडून व्यक्त होत आहे. नवरात्रोत्सवात नैसर्गिक सजावटीसाठी फुले हा अतिशय उत्तम पर्याय असल्याने वेगवेगळ्या फुलांचा आरास सजावटीसाठी अधिकाधिक वापर केला जातो. यंदाही हे चित्र कायम असून, फूलबाजार गर्दीने गजबजून गेला आहे. यात सर्वाधिक मागणी झेंडूच्या फुलांना असून, अन्य सुगंधी फुलांनाही चांगली मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. बाजारात कापडाची कृत्रिम फुले उपलब्ध असली तरी भारतीय संस्कृतीतील विविध सण, उत्सवांमध्ये खऱ्या फुलांची सजावट विशेष आकर्षक ठरते. हार-तुरे, गजरे, तोरणे अशा अनेक रूपांत ही फुले उत्सवात आणखी सुंदरता भरतात. बाजारात बाराही महिने फुले उपलब्ध असली, तरी सणांच्या काळात त्यांची मागणी कितीतरी अधिक पटीने वाढते. पर्यावरणपूरक संकल्पनांवर आधारित गणेशोत्सव आणि सुगंधी फुलांचे आकर्षण यामुळे फूलबाजारात नवरात्रोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात विविध फुलांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे फूलविक्रेत्यांनी सांगितले.  नवरात्रोत्सवात विविधरंगी फुलांच्या सुगंधामुळे बाजारातही उत्साह आणि चैतन्याचे वातावरण पहायला मिळत आहे. नाशिक शहर परिसरातील मखमलाबाद, आजगाव, दरी मातोरी, जानोरी, मोहाडी परिसरांतून प्रामुख्याने फुलांची आवक होत असून, दिंडोरी आणि सिन्नर परिसरातील फुलशेतीला यावर्षी परतीच्या पावसाचा फटका बसल्याने फुलांचे भाव वधारल्याचे विक्रेता संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले. 

इन्फो- असे आहेत दर :झेंडू जाळी-१२५ ते १५० रुपये मोगरा (प्रतिकिलो) - ६०० ते ८०० रुपये,अस्ट्रर - १८० ते २०० रुपये शेवंती (प्रतिकिलो)-१५० ते २०० रुपये,गुलाब (प्रति १० नग) १० ते १२ रुपये, साधा गुलाब (प्रति १० नग) ८ ते १० रुपये,निशिगंधा (प्रतिकिलो) १५० ते १८० रुपये, जरबेरा (प्रति १० नग) ५० ते ६० रुपये.लीली (प्रती ५० नग) १० -२५ रुपये  

टॅग्स :Navratriनवरात्रीNashikनाशिकcultureसांस्कृतिकMarketबाजार