शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

चौथ्या दरोडेखोराला मुंबईतून अटक

By admin | Updated: July 30, 2014 00:17 IST

सराफी पेढी दरोडा प्रकरण : चार रिव्हॉल्वरसह २१ जिवंत काडतुसे हस्तगत

नाशिकरोड : दत्तमंदिररोड येथील शहाणे सराफ या सराफ पेढीवर दरोडा टाकून व दुकान मालकावर गोळीबार करून फरार झालेल्या दरोडेखोरातील चौथ्या दरोडेखोराला नाशिक क्राईम ब्रॅँच युनिट ३ च्या पथकाने मुंबईतील गोरेगाव येथे जाऊन शिताफीने पकडले. त्यांच्याकडून चार रिव्हॉल्वर व २१ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. आहेत. दत्तमंदिररोड येथील शहाणे सराफ या पेढीवर रविवारी भरदुपारी सव्वातीनच्या सुमारास चार-पाच सशस्त्र दरोडेखोरांनी रिव्हॉल्वरचा धाक दाखवून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानमालक व त्यांच्या मावस भावाच्या कडव्या प्रतिकारामुळे त्यांचा लुटीचा प्रयत्न असफल झाला होता. मात्र यावेळी दरोडेखोरांनी सहीसलामत पळून जाण्यासाठी अभय शहाणे यांच्या पोटात एक गोळी झाडून जखमी करून पलायन केले होते. मात्र नाशिक पोलिसांनी ठाणे ग्रामीण पोलिसांच्या मदतीने दरोड्याच्या घटनेनंतर अवघ्या अडीच तासांत पडघा येथे शेषनाथ सुदामा उपाध्ये, मुरली जिन्नप्पा पुजारी, हैदरअली गबू शेख यांना अटक केली होती, तर त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले होते.नाशिक क्राईम ब्रँचची कामगिरीनाशिक क्राईम ब्रॅँच युनिट तीनचे पोलीस निरीक्षक संजय सानप, हवालदार सुभाष गुंजाळ, सुभाष सातपुते, अनिल उबाळे, विलास गांगुर्डे, गंगाधर केदारे, राजू जाधव यांचे पथक मिळालेल्या गुप्त माहितीनुसार लागलीच मुंबईला रवाना झाले होते. क्राईम ब्रॅँचच्या पथकाने दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी मेहताब आलम ललईखान (३८) व्यवसाय मच्छी विक्रेता रा. शिवशाही, म्हाडा कॉलनी, गोरेगाव, पूर्व मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश याला आज त्याच्या राहत्या घराजवळ सापळा रचून शिताफीने पकडले. त्यांच्याकडून चार रिव्हॉल्वर व २१ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. दरोडेखोर मेहताब आलम ललईखान हा कुप्रसिद्ध दरोडेखोर असून, त्याची व त्याच्या सहकाऱ्याची दरोडे व जबरी चोरी करणारी मोठी गॅँग आहे, तर फरार पाचव्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)