शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

मदरशाचे चौदा विद्यार्थी रुग्णालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:50 IST

परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गावातील दारुल उलूम गौसिया फैजाने मदार या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले आहेत.

वडाळागाव : परिसरात साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यात आरोग्य विभागाला अद्याप यश येत नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. गावातील दारुल उलूम गौसिया फैजाने मदार या मदरशामध्ये शिकत असलेले निवासी चौदा विद्यार्थी अचानक थंडी-तापाने फणफणले आहेत. दोन दिवसांत चौदा विद्यार्थ्यांसह धर्मगुरूंना पालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.वडाळागाव परिसरातील सादिकनगर, महेबूबनगरसह संपूर्ण वडाळागाव गावठाण परिसरात डासांच्या वाढत्या उच्छादाने नागरिक हैराण झाले आहेत. वडाळागावातील संसर्गजन्य सांधेदुखी, चिकुनगुण्या या आजाराने मागील महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात डोके वर काढले होते.डासांच्या अळ्यांची उत्पत्तीवडाळागाव परिसरात सर्वेक्षणादरम्यान घरगुती पाणीसाठ्यामध्ये डासांच्या अळ्यांची उत्पत्ती आढळून आली होती. हिवताप नियंत्रण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित घरांमधील वापराच्या पाणीसाठ्यात औषध फवारणी क रत पाणीसाठे रिकामे करण्याच्या सूचनादेखील जून महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात केल्या होत्या; मात्र अद्याप नागरिकांच्या घरांमधील पाणीसाठ्यात होणारी अळ्यांची उत्पत्ती थांबत नसल्याचे निदर्शनास आले आहे.  पुन्हा साथीच्या आजाराचा फैलाव होण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत मदरशाचे चौदा विद्यार्थी व धर्मगुरू मौलाना कारी जुनेद आलम हेदखील संसर्गजन्य थंडी-तापाच्या आजाराने त्रस्त झाले आहेत. काही रुग्ण विषमज्वर आजाराचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. रक्तनमुने संकलन करण्यात आले असून, तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकाºयांनी दिली.  पावसाच्या हजेरीनंतर जुलैअखेर वडाळागाव परिसरात पुन्हा डासांचे प्रमाण वाढले आहे. सार्वजनिक स्वच्छतेचाही प्रश्न गावात ‘जैसे थे’ आहे. गोपालवाडी, राजवाडा, जय मल्हार कॉलनी, सादिकनगर, महेबूबनगर या भागात गटारी तुंबल्या असून, सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे. जय मल्हार कॉलनीजवळ कॅनॉल रस्त्याला लागून असलेली भूमिगत गटार महिनाभरापासून तुंबलेली असल्यामुळे पाटाच्या सखल भागात सांडपाण्याचे डबके साचले आहे. तसेच गोपालवाडी रस्त्यावरही गटारी वाहत असून, गटारींची स्वच्छता करण्याची मागणी होत आहे. संजरी मार्ग, मुख्य वडाळा रस्त्यालगतच्या उघड्या गटारींचा गाळ उपसला गेला असला तरी उर्वरित परिसरातील गटारींची अवस्था बिकट आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्य