सिडको : अल्पवयीन मुलीचा एका तरुणाने विनयभंग केल्याची घटना अंबड परिसरातील आझादनगर येथे बुधवारी सायंकाळी घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, आझादनगर परिसरात राहणारी महिला आपल्या घरातील सामानाची आवरासावर करीत होती़त्यांच्या घराशेजारी राहणारा संशयित अनिसकुमार मनोज प्रसाद (२०) याने या चारवर्षीय मुलीला आपल्या घरात नेऊन तिचा विनयंभग केला़ या प्रकरणी मुलीच्या आईच्या फि र्यादीवरून संशयित प्रसादविरूद्ध लहान बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे़ (वार्ताहर)
अंबडला चार वर्षीय मुलीच विनयभंग
By admin | Updated: May 31, 2014 00:27 IST