शहरं
Join us  
Trending Stories
1
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
2
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
3
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
4
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
5
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
6
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
7
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
8
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
9
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
10
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
11
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
12
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
13
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
14
मतमोजणीपूर्वी १ जूनला INDIA आघाडीची बैठक बोलावण्यामागे खर्गे आणि काँग्रेसची अशी आहे रणनीती
15
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
16
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
17
४ जूननंतर नितीश कुमार घेऊ शकतात मोठा निर्णय; तेजस्वी यादवांच्या नव्या दाव्यामुळे उडाली खळबळ
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

धोंडेगाव : ‘त्या’ शेतकऱ्याच्या खूनप्रकरणी चौघांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 5:48 PM

धोंडेगाव शिवारातील एका उपचार केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज तपासले असता त्यामध्ये त्यांना गुन्ह्यातील पांढ-या रंगाची कार आढळून आली.

ठळक मुद्देस्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्याबनावट क्रमांकावरूनच पोलिसांचा संशय अधिक बळावला.

नाशिक : दहा ते बारा दिवसांपुर्वी हरसूल पोलीस ठाणे हद्दीतील धोंडेगाव शिवारात रात्रीच्यावेळी पांढºया रंगाच्या मोटारीतून आलेल्या हल्लेखोरांना धारधार शस्त्राने हल्ला चढवून एका शेतक-यास ठार मारले होते. या खूनाच्या घटनेतील संशयित चौघा हल्लेखोरांच्या ग्रामिण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या.कर्जदाराचा पत्ता न सांगितल्याने मखमलाबाद येथील सावकारासह दिंडारी तालुक्यातील उमराळे येथील त्याच्या तीन साथीदारांनी मनात राग धरून सोमवारी (दि.११) रात्री आठ वाजेच्या सुमारास शेतकरी मोतीराम वामन बेंडकोळी (५५,रा. धोंडेगाव) यांचा निघृण खून केला होता. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्याच आलेल्या चौघांनी खूनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.संशयित हिरामण काशिनाथ धात्रक (४३, रा. उमराळे), गणेश दत्तात्रय मानकर (४३, रा.मखमलाबाद), रामनाथ बबन शिंदे (३३, रा, उमराळे बु.) आणि विकास उर्फ कृष्णा शिवाजी धात्रक (३०, रा. उमराळे ) अशी अटक करण्यात आलेल्या संशियतांची नावे आहेत. ११ मे रोजी रात्री शेतातून घराकडे परतत असताना वरील संशयित हल्लेखोरांनी वाट अडवून मोतीराम यांचा धारदार शस्त्राने वार करून खून केला होता. ही बाब मंगळवारी (दि.१२) सकाळी उघडकीस आली होती. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी या खूनाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. वरिष्ठ पोलीस निरिक्षक के.के.पाटील, सहा.निरिक्षक स्वप्नील राजपुत, उपनिरिक्षक रामभाऊ मुंढे, रवींद्र शिलावट, हनुमंत महाले, दत्तात्रय साबळे, हेमंत गिलबिले आदिंच्या पथकाने घटनास्थळ गाठले आणि तपासाला गती देत मिळालेल धागेदोऱ्यांवरून उमराळे येथून पहिल्यांदा हिरामण धात्रक यास स्विफ्टच्या (एम.एच.१५ डीएस९१७८) संशयावरून ताब्यात घेतले आणि पुढे खूनाचा उलगडा झाला. धात्रक याने फायनान्स कंपनीचे हप्ते थकविल्यामुळे कंपनी वाहन उचलून घेउन जाईल या भीतीपोटी तो बनावट वाहनक्रमांक वाहनाला लावून वाहन वापरत होता. त्याने एम.एच१५ डीएम ५००९ या क्रमांकाची नंबरप्लेट स्विफ्टवर लावली होती. या बनावट क्रमांकावरूनच पोलिसांचा संशय अधिक बळावला.सीसीटीव्ही फुटेजवरून हल्लेखोरांचा काढला मागधोंडेगाव शिवारातील एका उपचार केंद्राच्या सीसीटीव्ही कॅमे-याचे फुटेज तपासले असता त्यामध्ये त्यांना गुन्ह्यातील पांढ-या रंगाची कार आढळून आली. या सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी तपासाला गती दिली. या चौघा संशयितांनी पांढºया रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून धोंडेगाव गाठले. येथील जाखनमळा पाट रस्ता परिसरात बेंडकोळी यांना एका व्यक्तीचा पत्ता विचारला यावेळी त्यांनी पत्ता सांगण्यास नकार दिल्याने चौघांनी धारधार सुºयाने त्यांच्यावर सपासप वार केले. यामुळे बेंडकोळी रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यानंतर हल्लेखोर स्विफ्ट कारमधून पळून गेले होते.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारीMurderखून