शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

चौपदरीकरण : चांदवड-मनमाड-नांदगाव-चाळीसगाव-जळगावपर्यंतचा प्रवास होणार सुलभ चांदवड-जळगाव रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात हस्तांतरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 00:36 IST

जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरला (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देजळगाव व नाशिकला जाणे येणे सुलभ५९७ कोटीचा खर्च अपेक्षित

नांदगाव : जळगाव ते चांदवड राष्ट्रीय महामार्गाच्या डीपीआरला (सविस्तर प्रकल्प अहवाल) केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. या महामार्गाची लवकरच निविदा प्रक्रिया होऊन या कामाला गती मिळणार आहे. सुरुवातीला जळगाव ते नांदगावपर्यंतच्या तीन टप्प्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्यामुळे जळगाव व नाशिकला जाणे येणे सुलभ होणार आहे. यासाठी ५९७ कोटीचा खर्च अपेक्षित आहे, अशी विश्वसनीय माहिती मिळाली आहे.चाळीसगाव ते जळगाव या राज्य मार्ग क्रमांक १९चे रूपांतर आता राष्ट्रीय महामार्ग जे ७५३मध्ये झाले आहे. तसे राजपत्रही घोषित करण्यात आले आहे. चाळीसगाव, नांदगाव, मनमाड ते चांदवडपर्यंत हा महामार्ग असणार आहे. यांची लांबी साधारणपणे २०० किलोमीटर आहे. चांदवड ते जळगाव या दोनशे किलोमीटर रस्त्याचे राष्ट्रीय महामार्गात हस्तांतरण झाल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने हा रस्ता चौपदरी करण्याच्या दृष्टीने वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. सुरुवातीला जळगाव ते भडगाव व भडगाव ते चाळीसगाव या १०३ किलोमीटर अंतराच्या दोन टप्प्याचा डीपीआर मंजुरीसाठी केंद्राकडून पाठविण्यात आला होता. त्यानंतर चाळीसगाव ते नांदगाव हा ४४ किलोमीटर अंतराचा तिसरा टप्प्याचा डीपीआर तयार करण्यात आला. या डीपीआरलादेखील मंजुरी मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबतचे अधिकृत आदेश लवकरच निघण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे रस्ता बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, तर नांदगाव ते चांदवड या चौथ्या टप्प्याचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. जळगाव ते भडगाव या ५६ किलोमीटरच्या अंतरासाठी २४१ कोटी, भडगाव ते चाळीसगाव ४६ किलोमीटर साठी २१४ कोटी तर चाळीसगाव ते नांदगाव या ४४ किलोमीटसाठी १६८ कोटी खर्च अपेक्षित आहे. डीपीआरच्या अंतिम मंजुरीनंतर याची निविदा प्रक्रि या पार पडेल त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरु वात होईल.असा असेल राष्ट्रीय महामार्ग चांदवड ते जळगाव हा दोनशे किलोमीटरचा मार्ग असून, त्याची रुंदी दहा मीटर असणार आहे. प्रत्येकी पाच मीटरचे जाण्या-येण्याचे मार्ग असणार आहे. हा महामार्ग बीओटी (बांधा वापरा व हस्तांतरित) तत्त्वावर असेल. चाळीसगाव ते जळगाव या दरम्यान एकूण नऊ ठिकाणी या रस्त्याला बायपास राहतील. या महामार्गाचे जळगाव ते भडगाव हे अंतर ५६:२ किलोमीटर, भडगाव ते चाळीसगाव ४६:८ किलोमीटर व चाळीसगाव ते नांदगाव ४४ किलोमीटर अंतर आहे.जळगाव, नाशिक जाणे होईल सुकरजळगाव जिल्ह्याचा चाळीसगाव हा शेवटचा तालुका. दोघांचे अंतर शंभर किलोमीटरपर्यंत. चाळीसगावच्या व्यक्तीला जळगाव बसने जायचे म्हटले तर तीन तास लागतात. मात्र राज्य महामार्ग क्र मांक एकोणावीस आता राष्ट्रीय महामार्ग झाल्याने वेग वाढण्यास मदत होणार आहे, तर नाशिक, मुंबईला जाणेही सोयीचे होणार आहे. याशिवाय या भागाच्या औद्योगिक विकासाला यामुळे चालना मिळण्यास मदत होऊ शकणार आहे.