शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बनावट नोटांप्रकरणी चौघांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 01:27 IST

सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागातील आदिवासी गाव, पाड्यांवर वलसाड पोलिसांनी कारवाई करत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ताब्यात घेतलेल्या चौघांना वलसाड न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देवापीला गुन्हा : उद्या पुन्हा न्यायालयात हजेरी

नाशिक : सुरगाणा तालुक्यातील गुजरात सीमावर्ती भागातील आदिवासी गाव, पाड्यांवर वलसाड पोलिसांनी कारवाई करत बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. ताब्यात घेतलेल्या चौघांना वलसाड न्यायालयाने येत्या शनिवारपर्यंत (दि.१९) पोलीस कोठडी सुनावली.नव्या चलनातील नोटांशी साम्य असलेल्या बनावट नोटा हुबेहूब तयार करुन गुजरातच्या धरमपूर तालुक्यात चलनात आणण्याचा डाव वलसाड पोलिसांनी उधळून लावला. महाराष्ट्र-गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या सुरगाणा तालुक्यातील सीमावर्ती गावे गुही, मांदा, मोरचोंड येथून चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. यामधील संशयित हरिदास चौधरी यास यापूर्वी सुरगाणा पोलिसांनी मद्य तस्करीच्या गुन्ह्यात बेड्या ठोकल्या होत्या. या सराईत चौधरीविरुध्द सुरगाण्यासह सापुतारा पोलीस ठाण्यातही विविध गुन्हे दाखल आहेत. त्याचे साथीदार संशयित जयसिंग वळवी, भगवंत डंबाळे, अनिल बोचल यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या गुन्ह्याचा म्होरक्या अनिल हा पदवीधर असून त्याने इतरांच्या मदतीने त्याच्या टेंभरुणपाडा येथील राहत्या घरी बनावट नोटा तयार केल्याचे पोलिसांच्या तपासातून पुढे आले आहे. उंबरठाण येथे त्याने सेतू कार्यालय चालविण्यास घेतले असून कार्यालयातील संगणक, प्रिंटरच्या मदतीने त्याने हा ‘उद्योग’ सुरु केल्याचे वलसाड पोलिसांनी सांगितले.सीमावर्ती भागातील आदिवासी गाव, पाड्यांवर चालणारे अवैध जुगार, मद्यविक्रीच्या अड्ड्यांवर तसेच गाव, पाड्यांवर भरणाऱ्या आठवडे बाजारांमध्ये मोठ्या चलाखीने बनावट नोटा चलनात टोळीकडून आणल्या जात होत्या. रोकड पुरलीमांदा येथील राहत्या घराच्या पाठीमागे हरिदास चौधरी या सराईत गुन्हेगाराने तीन लाखांच्या बनावट नोटा जमिनीत पुरल्याचे पोलिसांनी उघडकीस आणले आहे. पुरलेल्या बनावट नोटा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात हा सगळा बनावट नोटांचा कारखाना उभा राहत असताना ग्रामीण सुरगाणा तालुका पोलिसांना मात्र त्याचा मागमूस लागला नाही. वलसाड पोलिसांनी ‘नेटवर्क’च्या माध्यमातून हे रॅकेट उघडकीस आणले.

टॅग्स :NashikनाशिकCrime Newsगुन्हेगारी