शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

सात अपघात: नाशिकमधील उपनगरांत चार ठार; नऊ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 17:02 IST

त अपघातांच्या घटनांमध्ये चार ठार, तर नऊ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश आहे. याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपघातांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देएका अपघातात सहा जखमी अपघातग्रस्त वाहन सोडून पळ काढला

नाशिक : शहरातील विविध उपनगरीय भागांमध्ये झालेल्या सात अपघातांच्या घटनांमध्ये चार ठार, तर नऊ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन युवक व दोन इसमांचा समावेश आहे. याबाबत विविध पोलीस ठाण्यांमध्ये अपघातांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काठे गल्ली सिग्नलवरून पायी जात असलेले मधू सदन गोराई (३०, मूळ रा. धनबाद, झारखंड) यांना आयशर ट्रकने (डीएन ०९ के ९२४६) जोरदार धडक दिली. या धडकेत मधू यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ट्रकचालक पांडुरंग दिगंबर इमडे (३५, रा. नांदेड) याने घटनास्थळावरून रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास अपघातग्रस्त वाहन सोडून पळ काढला होता. या प्रकरणी पोलीस नाईक सुरेश गांगुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पांडुरंगविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी उपनिरीक्षक एस. सी. कासर्ले यांनी तपास करत पहाटेच्या सुमारास पांडुरंग यास अटक केली.दुसऱ्या घटनेत गंगापूररोड-हनुमानवाडी लिंकरोडवरून जात असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीस्वार सुनील दौलत महाले हा दुभाजकावर जाऊन आदळला. महाले दुचाकीवरून (एमएच १५ बीए ६२८२) विना हेल्मेट भरधाव जात असताना हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने महाले याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. तिस-या घटनेत नाशिक-पुणे महामार्गावरील नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून प्रवास करत असताना शिवाजी तुकाराम गुंजाळ (५५, रा. शिखरेवाडी) हे दुचाकीवरून जात असताना चक्कर आल्याने तोल जाऊन दुचाकी दुभाजकावर आदळली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाथर्डी रोडवरून पायी जाणारा युवक पिंटू काळू सीध (२५, रा. देवगाव, त्र्यंबकेश्वर) याचा अपघातात मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत ट्रकचालकाने त्याला जबर धडक दिली. अनोळखी ट्रकचालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केले. पोपट चंदू देहाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक क्रमांक एमएच ०४ एच ३१७२ या अपघातग्रस्त चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.----एका अपघातात सहा जखमीआडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जाणारी भरधाव टुरिस्ट बसने (०५बी.एक्स ४४२२) ने टेम्पो (एम.एच १२ एम व्ही ५०३३) ला जोरदार धडक दिली. या धडकेत जगदीश रणपिसे, अलकाबाई भोर, जयश्री रणपिसे, सोमनाथ बागर, शाकुबाई कामठे, सुनीता बांगर (सर्व. रा.शिरुर, पुणे) हे जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहनांमध्ये झालेली धडक इतकी गंभीर होती की वाहनांचा चेंदामेंदा झाला सुदैवाने या अपघातात जीवीतहानी टळली. याप्रकरणी टुरिस्ट बसचालक ओमसिंग नारायणसिंग राजपुत (२३,रा.बाडनेर, राजस्थान)विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर राजपूत फरार झाला आहे.दुस-या घटनेत पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडजाईमाता नगर परिसरात फिर्यादी लक्ष्मण भाऊसाहेब नेहे (४३, रा.मखमलाबादरोड) हे पत्नीसमवेत पायी जात असतानान खंडेराव मंदिराजवळ दुुचाकीस्वार अनिकेत चव्हाण याने दुचाकी (एम.एच१५ एडी ९३९३) भरधाव वेगाने दामटवित रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करीत मनीषा नेहे यांना धडक दिली. या धडकेत मनिषा या जखमी झाल्या असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. अपघातानंतर दुचाकीस्वार घटनास्थळावरुन फरार झाला. तीस-या घटनेत पाईपलाईन रोडवरील हनुमाननगर कॉलनी रस्त्यावर फिर्यादी बापु नामदेव हेंबाडे (३९, धु्रवनगर) हे दुचाकीवरुन (एम.एच १५ बीजी १९९५) आई व आठ वर्षाच्या मुलाला घेऊन घराकडे जात असताना संशयित दुचाकीस्वार यश जितेंद्र गांगुर्डे (रा.शिवाजीनगर) याने दुुचाकी (एम.एच.१५ ई डब्ल्यू १०७९) विरुध्द दिशेने दामटवित हेंबाडे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांची दुचाकी कोसळली व हेंबाडे व दुचाकीचालक गांगुर्डे हे दोन्ही जखमी झाले आहेत. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गांगुर्डेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Accidentअपघातroad safetyरस्ते सुरक्षाNashikनाशिक