शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

चौघांनी मोटारीतून येत शेतकऱ्याला मारले ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2020 15:56 IST

नाशिक : तालुक्यातील गिरणारे-हरसूल रस्त्यावरील धोंडेगाव शिवारात काश्यपी धरणाच्या जवळ एका रुग्णालयालगत असलेल्या शेतातून परतणारे मोतीराम बेंडकुळे (५५,रा.धोंडेगाव) यांच्यावर ...

ठळक मुद्देधक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आलीघटनेने धोंडेगाव, देवरगाव पंचक्रोशी हादरली आहे

नाशिक : तालुक्यातील गिरणारे-हरसूल रस्त्यावरील धोंडेगाव शिवारात काश्यपी धरणाच्या जवळ एका रुग्णालयालगत असलेल्या शेतातून परतणारे मोतीराम बेंडकुळे (५५,रा.धोंडेगाव) यांच्यावर सोमवारी (दि.११) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास चौघा अज्ञात हल्लेखोरांनी मोटारीतून येत पत्ता विचारण्याच्या बहाणा करून धारधार शस्त्राने सपासप वार करून ठार मारल्याची धक्कादायक घटना मंगळवारी उघडकीस आली.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, धोंडेगावात राहणारे बेंडकुळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतावरून घरी परतत होते. यावेळी एका पांढ-या रंगाच्या मोटारीतून आलेल्या चौघांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबविले, यावेळी दुस-याने धारधार शस्त्राने त्यांच्या कमरेवर व छातीवर सपासप वार केले. यामुळे बेंडकुळे रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. रात्रीचा अंधार अन् निरव शांततेचा फायदा घेत हल्लेखोर आलेल्या वाहनातून पसार होण्यास यशस्वी ठरले. बेंडकुळे यांचा निघृण खून करण्यामागील नेमके क ारण काय असावे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.

हल्लेखोर ज्या वाहनांतून आले, ते वाहन तेथील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाले असून त्याअधारे आता पुढील तपासाला हरसूल पोलिसांनी गती दिली आहे. घटनेची माहिती मिळताच हरसूल पोलिस ठाण्याचे सहायक निरिक्षक विशाल टकले हे पोलीस कर्मचाºयांसह तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी पंचनामा पूर्ण करत मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालय नाशिक येथे हलविला.या अचानकपणे लॉकडाउन काळात घडलेल्या घटनेने धोंडेगाव, देवरगाव पंचक्रोशी हादरली आहे. हल्लेखोर नेमके कोण होते? ते कोणत्या मोटारीतून आले व त्यांनी बेंडकुळे यांना ठार का मारले? अशा एक ना अनेक प्रश्नांची पंचक्रोशीत चर्चा आहे. दरम्यान, बेंडकुळे यांचा नित्यक्रम माहित करुन घेत त्यांच्यावर पाळत ठेवून हल्लेखोरांनी हल्ला केला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. याप्रकरणी हरसूल पोलिसांनी अज्ञात संशयितांविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास टकले हे करीत आहेत.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसMurderखून