नाशिक : शहरात गेल्या पंधरवड्यापासून खुनाच्या चार घटना घडल्या असून, त्यातील तीन घटना या दोन टोळक्यांमधील सूडभावनेने घडल्याचे दिसून येते. गेल्या वर्षभरापासून टोळ्यांच्या कारवाया थंडावल्या असतानाच आता पुन्हा टोळक्यांनी डोके वर काढले आहे.शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये १२ एप्रिलपर्यंत नोंद झालेल्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहता शहरातील नागरिकांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र आहे़ त्यातच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सातपूरच्या दोघा युवकांचा खून, त्यानंतर विवाहितेचा हुंड्यासाठी सासरच्यांनी केलेल्या खुनापाठोपाठ शनिवारी रात्री अंतर्गत वादातून एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा झालेला खून व यानंतर परिसरात झालेली दगडफेक यामुळे नागरिकांच्या दहशतीत भरच पडली असून, कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
पंधरवड्यापासून खुनाच्या चार घटना
By admin | Updated: April 13, 2015 01:17 IST