शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

दारणात चारशे एमसीएफटी साठा पडून, तरी कपातीचे सकंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:09 IST

नाशिक : शहरासाठी यंदा परिसरातील तीन धरणांमधून मुबलक पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले असले तरी दारणा धरणातून गेल्या चार ...

नाशिक : शहरासाठी यंदा परिसरातील तीन धरणांमधून मुबलक पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले असले तरी दारणा धरणातून गेल्या चार महिन्यांपासून पाणी उचलणे राजकीय दबावामुळे बंद असून, त्याचा भार गंगापूर धरणावर आला आहे. अशावेळीक आरक्षणापेक्षा सुमारे दाेनशे दशलक्ष घनफूट पाणी या धरणातून उचलावे लागणार असल्याने तातडीने पाणीकपात करण्याची शिफारस पाणीपुरवठा विभागाने केली आहे. त्यामुळे लवकरच नाशिककरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

नाशिक शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा होतो. गेल्यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांकडे झालेल्या पाणी आरक्षणाच्या बैठकीसाठी नाशिक महापालिकेच्या मागणीनुसार प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यानुसार गंगापूर धरणातून ३८०० दशलक्ष घनफूट, दारणामधून ४०० तर मुकणे धरणातून १३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षित देण्यात आले आहे. मात्र, गेल्यावर्षी चेहेडी धरणातून पाणीपुरवठा करताना अडचणी निर्माण झाल्या. भगूर, देवळाली कॅम्प परिसरातील मलजल थेट बंधाऱ्यापर्यंत पोहोचत असल्याने दूषित पाण्याचा पुरवठा सुरू झाला आणि नाशिकरोड विभागातील नगरसेवकांनी त्यास विरोध केला आणि तेथून उपसा बंद केला. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून चेहेडी बंधाऱ्यातून नाशिकरोड विभागाला दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले असून त्याऐवजी गंगापूर धरणातून बारा बंगला आणि तेथून गांधीनगर जलकुंभ येथून त्या विभागाला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे दारणा धरणात ४०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा नाशिक महापालिकेसाठी आरक्षित असला तरी दारणा धरणातून पाणी उचलले गेले नाही. या धरणात महापालिकेने जेमतेम १६ दशलक्ष घनफूट पाणी उचलले आहे, तर दुसरीकडे गंगापूर धरणातून पाणी उपसा सुरू असून, या धरणात ३८०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण असले तरी आणखी अतिरिक्त दाेनशे दशलक्ष घनफूट पाणीसाठा आरक्षणाच्या मुदतीत म्हणजे ३१ जुलैपर्यंत लागणार आहे.

इन्फो...

सध्या पावसाचा भरवसा नसल्याने महापालिकेला दरवेळी काळजी घ्यावी लागते. यंदा केवळ नाशिकरोड विभागातील नगरसेवकांचा राजकीय दबाब म्हणून नाशिक महापालिकेला पाणी उचलता आलेले नाही. त्याचा फटका आता संपूर्ण नाशिककरांना बसला आहे. त्यामुळे एक वेळ पाणीपुरवठा किंवा पाणी पुरवठ्याच्या वेळेत कपात करावी, अशी शिफारस पाणीपुरवठा विभागाने आयुक्त कैलास जाधव यांच्याकडे केली आहे. आता त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

इन्फो...

नाशिकरोड विभागासाठी चेहेडी बंधारा येथून पाणी उपसा केला जातो. तेथील

मलजलाची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी महापालिकेने

अशाप्रकारचे मलजल येणाऱ्या नाल्याच्या वरील बाजूने पाइनलाइन टाकून

धरणातील पाणी उचलण्याचे ठरवले आहे. त्यासाठी शासनाकडून निधी मिळावा यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र तो मंजूर होत नाही आणि दुसरीकडे बंधाऱ्यातील पाणीच उचलू देत नसल्याने अखेरीस गंगापूर धरणावर ताण आला आहे.

इन्फो..

ग्राफसाठी आकडेवारी..

गंगापूर धरण आरक्षण - ३८०० दशलक्ष घनफूट, शिल्लक आरक्षण १०४८ दशलक्ष घनफूट

मुकणे धरण आरक्षण- १३०० दशलक्ष घनफूट, शिल्लक आरक्षण ४३३ दशलक्ष घनफूट

दारणा धरण आरक्षण - ४०० दशलक्ष घनफूट, शिल्लक आरक्षण - ३८३ दशलक्ष घनफूट