जायखेडा : आनंदपूर रस्त्यावरील शेवाळीनाला लगतच्या शेतात रात्री ११ वाजेच्या सुमारास बिबट्याने शेतातील गोठ्यात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला करून अशोक लोंढे या शेतकऱ्याच्या चार बकऱ्यांचा व एका बोकडाचा फडशा पाडला. या हल्ल्यामुळे पशुपालक धास्तावले असून, वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.जायखेडा व परिसरातील शेती शिवारात अनेक ठिकाणी बिबट्यांचा मुक्त संचार असुन, जायखेड्या पासुन जवळच असलेल्या सोमपुर शिवारातील विहीरीत पडलेला बिबट्या दोन दिवसांपूर्वीच काढण्यात आला होता. तर दुसरीकडे शेवरे येथील कांदाचाळीत घुसलेल्या बिबट्यास वनविभागाने दुसरÞ्या दिवशी जेरबंद केले होते. त्यानंतर लगेचच जायखेडा येथे बिबट्याने चार शेळ्या व एका बोकडाला ठार केल्याने शेतात राहणार्या व शेतात पाळीव जणावरे बांधनार्या शेतकरÞ्यांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण पसरले आहे. बहुतांश शेतकरी मळ्यात राहत असल्याने रात्री पहाटे घराबाहेर निघतांना घाबरत आहेत. बिबट्याच्या हल्ल्याची माहिती मिळाल्यावर वनविभागाचे कर्मचारी वनपाल मोहने व सोनवने यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. आशोक लोंढे यांना नुकसान भरपाई मिळावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. (वार्ताहर)
बिबट्याच्या हल्ल्यात चार शेळ्या ठार
By admin | Updated: August 5, 2016 22:29 IST