शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यात चार दिवसाआड पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:13 IST

तालुक्यातील ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा पाणीपुरवठा योजनेच्या विहिरींनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

सटाणा : तालुक्यातील ठेंगोडा येथील गिरणा नदीपात्र कोरडेठाक झाल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ठेंगोडा पाणीपुरवठा योज नेच्या विहिरींनीदेखील तळ गाठला आहे. त्यामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.  पालिका प्रशासनाने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून १२ एप्रिलपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ठेंगोडा नदीपात्रातून तसेच आरम नदीपात्रातून पाणीपुरवठा योजना तयार करण्यात आली आहे. यंदा मार्च महिन्याच्या मध्यावरच शहरात पाणीटंचाईने डोकेवर काढले आहे. गिरणा व आरम नदीपात्र पूर्णपणे कोरडे झाल्याने पाणीपुरवठा योजनांच्या विहिरींनी तळगाठले आहे.पाण्याअभावी पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्याने पालिका प्रशासनाने आता पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे. चणकापूर व केळझर या मध्यम प्रकल्पांच्या पुढील आवर्तनापर्यंत ही पाणी कपात केली असून, मंगळवारपासून चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी सांगितले. सहा जलकुंभमधून पाण्याचे नियोजन करून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ जलकुंभमधून अभिमन्यूनगर, शांतीनगर, महाबीज परिसर, शिवाजी नगर, भाक्षीरोडमधील वसाहतीसाठी २० मार्च ते ९ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. याच जलकुंभामधून श्रीकृष्णनगर, क्रांतीनगर, सन्मित्र हौसिंग त्रिवेणी संगम, वृंदावन कॉलनी, समर्थनगर वसाहतीत २२ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत चार दिवसाआड पाणीपुरवठा होईल. कै. तुकाराम सोनवणे जलकुंभामधून मित्रनगर, गणेशनगर, पीडीपीनगर, न्यू प्लॉट, श्यामजीनगर वसाहतीत व उपासनी रोड, देवी गल्ली, संभाजी रोड, नामपूरचाळ, महात्मा गांधी रोड, फुले रोड वसाहतीमध्ये अनुक्र मे २० मार्च ते ९ एप्रिल व २२ मार्च ते ११ एप्रिलपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येईल.

टॅग्स :Waterपाणी