शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चांदवडला चार दिवस लॉकडाउन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2020 23:21 IST

चांदवड : चांदवडमध्ये आठवडे बाजार तळ येथे सोशल डिस्टन्सिंगला नागरिकांनी हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांना शिस्त लागावी ...

ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंगला हरताळ : नगरपरिषदेने घेतला निर्णय

चांदवड : चांदवडमध्ये आठवडे बाजार तळ येथे सोशल डिस्टन्सिंगला नागरिकांनी हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. नागरिकांना शिस्त लागावी आणि कोरोनावर मात करता यावी, या उद्देशाने नगर परिषदेने चार दिवस लॉकडाउनची घोषणा केली आहे.संचारबंदी कालावधीतही नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी जीवनावस्य्हक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात येतात. मात्र, नागरिक सोशल डिस्टन्सिंगची अंमलबजावणी करत नसल्याचे येथील बाजारपेठेतील चित्र पाहून दिसून येत आहे. त्यामुळे नगरपालिकेने कठोर भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज सकाळी भरत असलेला भाजीबाजार हा रोडवर तसेच कॉलनीच्या रस्त्यावर भरतो त्या ठिकाणी जागा कमी असल्याने खूप गर्दी होत आहे तसेच रोडवरील वाहतूक यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, यामधून कोरोनाचा संसर्ग पसरण्याची मोठी भीती आहे. म्हणून हा बाजार बाजार पटांगणात भरविल्यास मोकळी जागा उपलब्ध आहे त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळण्यास जागा आहे तेव्हा काही अघटित घडण्याची वाट न पाहता तो भाजीबाजार बाजार तळ या ठिकाणी भरविण्यात यावा अशी मागणी समता परिषदेचे अध्यक्ष डॉ. अरुण निकम यांनी नगर परिषदेच्या प्रशासनाकडे केली होती.दरम्यान गेल्या चार दिवसांपासून नगर परिषदेने सकाळी ८ ते ११ वाजेच्या दरम्यान भाजीबाजार फक्त सकाळी एक वेळ भरण्याची परवानगी दिली. तर या भाजीविक्रेत्यांना दूर अंतरावर जागा आखून दिली असतानाही या भाजी बाजारात भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक गर्दी करताना दिसत होते. यासाठी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही आठवडे बाजारात कर्मचारी तैनात करुन शिस्तीने दुकाने लावून घेतली गर्दी होत असेल तर त्यावर कर्मचारी नियंत्रण करतात; मात्र ग्राहकच गर्दी करतात. दोन दुकानांमधील अंतर चांगले ठेवले असून शिस्त ठेवली असताना ग्राहक नको तेवढी गर्दी करीत असल्याने सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात असून, ग्राहकांना आमचे कर्मचारी मास्क लाव , गर्दी करु नका असे सांगत असताना ते कर्मचाऱ्यांना दाद देत नसल्याचे कासलीवाल यांनी सांगितले.दरम्यान, चांदवड नगर परिषदेच्या वतीने चांदवड शहरात चार दिवसांचे कडक लॉकडाउन मोहीम आखली असून सद्यस्थिती कोरोनाचा प्रसार जलद गतीने होत असल्याने चांदवडकरांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिक पूर्वी आठवड्याचा भाजीपाला सोमवारच्या दिवशी घेऊन जात असे आता लॉकडाउन काळात दररोज नागरिक भाजीपाला घेण्यास येतात. पूर्वी किराणा सामान पंधरा दिवसांचे भरून ठेवत असत, मात्र दररोज आता किराणा दुकानात गर्दी करीत आहेत.शब-ए-बारात या पवित्र सणाच्या दिवशी कुणीही बाहेर पडू नये. या दिवशी नफील नमाज पठण आपल्या घरीच अदा करावी व कब्रस्तानमध्ये जाण्याचे टाळावे. तर कोरोनाविरोधात लढाईमध्ये खंबीरपणे उभे राहून सर्वांनी साथ द्यावी, असे आवाहन नगर परिषदेच्या वतीने उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल, सर्व नगरसेवक यांनी केले आहे.

बाजार समितीत एसएमएसद्वारे कांदा लिलावचांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कोरोना पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी बाजार समितीने नोंदणी पद्धतीने कांदा लिलाव सुरु केले आहेत. दररोज फक्त ४०० ते ५०० टॅक्टर्सचा लिलाव केला जाणार आहे. तर लिलावात सहभागी होण्यासाठी शेतकºयांनी आधी नोंदणी केल्यानंतर त्यास आज लिलाव होईल याचा निरोप एसएमएसद्वारे कळविण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर, सचिव जे. डी. आहेर यांनी दिली. शेतकºयांनी कांदा मोकळ्या स्वरुपात किंवा बारदान गोणीत भरुन निवड करुन प्रतवारी करुन विक्रीस आणावा. चांदवड बाजार समितीने कांदा गोणी पद्धतीने लिलाव सुरु केले होते, मात्र बाजार समितीतील गर्दी कमी होत नसल्याने दि. २७ मार्चपासून कांदा लिलावासाठी नोंदणी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानंतर दोन दिवसात शेतकºयांनी बाजार समितीकडे लिलावासाठी नोंदणी केली. दररोज ४०० ते ५०० टॅक्टर्सना एसएमएसद्वारे कळवून लिलावासाठी बोलविण्यात येत आहे. नोंदणीसाठी बाजार समितीत येण्याची गरज नाही. फोन, एसएमएस, ईमेलद्वारे नोंदणी स्वीकारण्यात येत आहे. तर बाजार समितीने त्या ठिकाणी शेतकºयांना हात धुण्याची व्यवस्था केली. परिसर जंतुनाशकाने फवारणी केली असून, चांदवड येथे आवक २४३ वाहने तर भाव उन्हाळ कांदा जास्तीत जास्त १२०४ व कमीत कमी एक हजार रुपये तर लाल कांदा जास्तीत जास्त ८४६ व कमीत कमी ६५० रुपये आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्य