शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी ; ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:01 IST

दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, भाऊबीजला मात्र बँकांना सुट्टी मिळणार नाही, परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिन्यातील दुसरा शनिवार असल्याने बँका बंद राहणार असून, लगोलग रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळेही बँका बंद राहणार असल्याने नाशिककरांची चांगलीच गैरसोय होणार आहे.

ठळक मुद्देदिवाळीत बँकांना मिळणार चार दिवस सुट्या नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता

नाशिक : दिवाळीत बँकांना चार दिवस सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन, गुरुवारी ८ नोव्हेंबर रोजी दिवाळी पाडवा असल्याने बँका बंद राहणार असून, भाऊबीजला मात्र बँकांना सुट्टी मिळणार नाही, परंतु त्यानंतर दुसऱ्याच दिवशी महिन्यातील दुसरा शनिवार (दि.१०) असल्याने बँका बंद राहणार असून, लगोलग रविवारच्या साप्ताहिक सुट्टीमुळेही बँका बंद राहणार असल्याने नाशिककरांची चांगलीच गैरसोय होणार आहे.दिवाळीच्या कालावधीत महिन्याच्या पहिल्या आठवड्यात औद्योगिक वसाहतींसह विविध क्षेत्रातील कामगार वर्गाचे वेतन थेट बँके च्या खात्यात जमा होणार आहे. परंतु त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात लगोलग दिवाळी सुरू होत असून, या कालावधीत तब्बल चार दिवस बंका बंद राहणार असल्याने ग्राहकासोबतच अनेक व्यापाऱ्यांचीही गैरसोय होणार आहे. त्यामुळे पुढच्या १५ दिवसांमध्ये बँकांचे व्यवहार करण्यासाठी सोमवारपासून ग्राहकांची गर्दी होऊ शकते. जवळपास सर्वच बँकांनी आॅनलाइन व्यवहारांची सेवा उपलब्ध करून दिली असून, शहरातील ठिकठिकाणचे एटीएमचा ग्राहकांना आधार मिळणार आहे. परंतु अजूनही मोठा वर्ग एटीएम, मोबाइल अ‍ॅप आणि आॅनलाइन व्यवहार करीत नाही. अनेक जण रोखीतच व्यवहार करण्यास पसंती देतात. अशा ग्राहकांना मात्र रोख रकमेची चणचण भासण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्याचा बाजारपेठेवरही थेट परिणाम होण्याची शक्यता अर्थशास्त्र तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.  

रोकड मिळणे कठीणदिवाळीच्या काळात असलेल्या चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे बाजारात रोकड टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर अनेकजण घरातील देवी-देवतांसह रोख रकमेचीही पूजा करतात. त्यासाठी अगोदरच बँकेतून रोकड काढली जाते. शिवाय गेल्या काही दिवसांपासून बँकेतून एका दिवसात केवळ २० हजार रुपयेच काढता येत असल्याने बँक खात्यातून रोख रक्कम काढून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे बँकांसोबतच एटीएममध्येही रोकड अपुरी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रNashikनाशिकbankबँकconsumerग्राहक