शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याच्या तयारीतील चौघांना बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 00:08 IST

अंबड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट-१चे पथक रात्रपाळीवर गस्तीवर असताना महालक्ष्मीनगर भागात दरोड्याच्या पूर्वतयारीत असलेल्या चौघा संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देअंबड । गावठी पिस्तूलसह जिवंत काडतुसे हस्तगत

नाशिक : अंबड पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे शाखा युनिट-१चे पथक रात्रपाळीवर गस्तीवर असताना महालक्ष्मीनगर भागात दरोड्याच्या पूर्वतयारीत असलेल्या चौघा संशयितांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दरोड्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.अंबड गावातील महालक्ष्मीनगर भागात साध्या वेशातील गुन्हे शाखा युनिट-१चे पथक शुक्रवारी (दि.३१) रात्री गस्तीवर होते. यावेळी संशयित रियासत अली रियाजुद्दीन मन्सुरी (२७), सिकंदरखान छोटूखान पठाण (४०), अरबाज रफिक शेख (२१), अजहर सरफराज शेख (१९), सलमान शेख (सर्व रा. शिवालाकला, जि. बिजनौर, उ.प्र.) या पाच संशयितांचे टोळके काही संशयास्पद हालचाली करताना रात्री बारा वाजेच्या सुमारास पोलिसांना आढळून आले. यावेळी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शिताफीने चौघांना ताब्यात घेतले, मात्र अंधाराचा फायदा घेत सलमान पोलीस पथकाच्या तावडीतून निसटून जाण्यात यशस्वी झाला.चौघांची झडती घेतली असता पोलिसांना त्यांच्याकडून एका गावठी पिस्तूलसह दोन जिवंत काडतुसे, धारदार मोठा सुरा, लोखंडी पोपट पान्हा, स्कू्र-ड्रायव्हर, लोखंडी मोठी कटावणी, नायलॉन दोरी यांसारखी घरफोडीसाठी लागणारी व प्राणघातक हत्यारे मिळून आली. पोलिसांनी या चौघांविरुद्ध अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून या टोळीतील फरार संशयित सलमानचा शोध घेतला जात आहे. तसेच चौघा संशयितांची कसून चौकशी केली जात असून त्यांच्याकडून शहरातील विविध भागात घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक बलराम पालकर हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरी