शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यंदा सार्वजनिक गणेशोत्सव चाळीस टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2020 00:38 IST

शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षाच्या तुलनेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. कोरोना संक्र मणाचा मोठा प्रभाव उत्सवावर पडल्याचे दिसत असून शासनाकडून देखील खबरदारी म्हणून विविध मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रभाव : मौल्यवानसह लहान-मोठ्या मंडळांची संख्या घटली

नाशिक : शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षाच्या तुलनेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. कोरोना संक्र मणाचा मोठा प्रभाव उत्सवावर पडल्याचे दिसत असून शासनाकडून देखील खबरदारी म्हणून विविध मर्यादा घालण्यात आल्या आहेत.गतवर्षीच्या तुलनेत ४० टक्के सार्वजनिक मंडळांनी बाप्पांची प्रतिष्ठापना करीत परंपरा जोपासली आहे. कोरोनामुळे यावर्षी गणेशोत्सवाचे सार्वजनिक स्वरूप अगदी कमी झालेले दिसत आहे. शासनाकडून गणेशोत्सव काळात भक्तांची वाढणारी गर्दी लक्षात घेता विविध निर्बंध व मर्यादा घातल्या गेल्या आहेत.यावर्षी शहरात १५ मौल्यवान, ११५ मोठे आणि १६४ लहान मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केली आहे. गतवर्षी शहरात एकूण ७१७ मंडळांनी नोंदणी केली होती.यंदा केवळ २९४ मंडळांकडून गणेशोत्सव साजरा होत आहे. कोरोनाच्या पाशर््वभूमीवर गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय बहुतांश मंडळाने घेतला आहे.त्यात अनेक छोट्या मंडळांनी गणेशोत्सवात थेट सहभाग घेण्याचे टाळले आहे.गतवर्षी सुमारे एक लाख घरगुती गणपती होते. मात्र यावर्षी मोठी त्यामध्येही घट झाली आहे. गणेश मूर्ती आणि मंडपाचा आकार, आरतीसाठी उपस्थित लोकांची अट, कोरोनाची भीती यामुळे अनेकांनी गणेशमूर्ती विराजमान न करण्याचा निर्णय घेणे पसंत केले. शहरात कोरोना संक्र मण अधिक पसरत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेशशासकीय आदेशानुसार प्रतिबंधित क्षेत्रात सण-उत्सव साजरा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाला सक्तीने नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले गेले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात नागरिकांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे शिस्तबद्धता आण िसाधेपणा दिसत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोकाही कमी झाला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवर वाढणारा बंदोबस्ताचा ताणदेखील हलका झाला असून यंदा मिरवणुकाही कोरोनामुळे रद्द झाल्या आहेत.

टॅग्स :NashikनाशिकGaneshotsavगणेशोत्सव