शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

जिल्ह्यातील कोरोना बळींनी ओलांडली चाळिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 01:46 IST

काेरोना रुग्णसंख्येत सतत वाढ सुरूच असताना, शुक्रवारी (दि. १६) आत्तापर्यंत प्रथमच बळींची संख्या चाळिशी ओलांडून ४१ वर पोहोचली आहे तर जिल्ह्यात ४,४३५ रुग्ण बाधित झाले असून ४,५९६ रुग्ण बरे झाले आहेत. 

ठळक मुद्देभयप्रद : दिवसभरात तब्बल ४१ बळी, २४ तासात आढळले ४४३५ नवीन बाधित 

नाशिक : काेरोना रुग्णसंख्येत सतत वाढ सुरूच असताना, शुक्रवारी (दि. १६) आत्तापर्यंत प्रथमच बळींची संख्या चाळिशी ओलांडून ४१ वर पोहोचली आहे तर जिल्ह्यात ४,४३५ रुग्ण बाधित झाले असून ४,५९६ रुग्ण बरे झाले आहेत. एकाच दिवसात एकूण ४१ बळी गेले असून, त्यात सर्वाधिक २६ बळी नाशिक ग्रामीण क्षेत्रामधील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या बळींची एकूण संख्या २,८५७ वर पोहोचली आहे. जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबरोबरच वाढणारे बळी रोखणे हे प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरले आहे. दरम्यान, जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रामध्ये २,४०३ तर नाशिक ग्रामीणला १,८३२ आणि मालेगाव मनपा क्षेत्रात १५० व जिल्हाबाह्य ५० रुग्ण बाधित आहेत. तसेच जिल्ह्यात नाशिक मनपा क्षेत्रात ९, ग्रामीणला २६, मालेगाव मनपा क्षेत्रात ४, जिल्हाबाह्य २ असा एकूण ४१ जणांचा बळी गेल्याने आरोग्य यंत्रणा निष्प्रभ ठरली आहे. गत आठवड्यात मृतांची संख्या सातत्याने तीसहून अधिक राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात यापेक्षाही कठोर उपाययोजनांची अंमलबजावणी व्हावी, असाच सूर सामान्य नागरिकांकडून  व्यक्त होऊ लागला आहे.ग्रामीणमध्ये प्रथमच तिप्पट बळीकोरोनाच्या पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेच्या प्रारंभीच्या टप्प्यातदेखील जिल्ह्यात बळींमध्ये नाशिक शहराची आघाडी होती. मात्र, एप्रिल महिन्याच्या प्रारंभापासून काही दिवस नाशिक शहर तर काही दिवस नाशिक ग्रामीण बळींमध्ये पुढे जात असल्याचे दिसून येत होते. मात्र शुक्रवारी नाशिक शहराच्या तुलनेत सुमारे तिप्पट बळी नाशिक ग्रामीणला गेल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाची दहशत अधिक वेगाने पसरत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यातील रुग्णांच्या प्रलंबित अहवालांची संख्या ७ हजारांवर

गत महिन्यापासून दररोज वाढत असलेल्या नमुन्यांमुळे कोरोना काळात सातत्याने प्रलंबित अहवालांची संख्या वाढलेली होती. गत दोन दिवसांत प्रलंबित अहवालांनी १० हजारांचा आकडा ओलांडला होता. मात्र, त्यात गुरुवारी अधिक प्रमाणात प्रलंबित अहवाल प्राप्त झाल्याने ही संख्या ७,६४७ वर आली आहे. त्यात सर्वाधिक प्रलंबित अहवाल नाशिक ग्रामीणचे ४१६२, नाशिक मनपा क्षेत्रातील २९०९ तर मालेगाव मनपाचे ५७६ अहवाल प्रलंबित आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या अद्याप वाढलेलीच असल्याने पुढचे चार दिवस बाधितांच्या प्रमाणात वाढ राहण्याची शक्यता आहे. मात्र विकेंड लॅाकडाऊनचा काही लाभ होवू शकतो.

टॅग्स :Nashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू