निफाड न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 09:42 PM2020-01-16T21:42:51+5:302020-01-17T01:13:47+5:30

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त निफाड तालुका विधी व न्याय सेवा समिती व निफाड वकील संघ यांच्या वतीने निफाड अपर व जिल्हा सत्र न्यायालयात प्रा. रशीद पठाण यांचे मराठी भाषा संवर्धन याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी निफाड न्यायालयाचे वर्ग १ जिल्हा न्यायाधीश आर. जी. वाघमारे होते.

Fortnightly Marathi language enrichment in Niphad court | निफाड न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

निफाड न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

Next

निफाड : मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त निफाड तालुका विधी व न्याय सेवा समिती व निफाड वकील संघ यांच्या वतीने निफाड अपर व जिल्हा सत्र न्यायालयात प्रा. रशीद पठाण यांचे मराठी भाषा संवर्धन याविषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी निफाड न्यायालयाचे वर्ग १ जिल्हा न्यायाधीश आर. जी. वाघमारे होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा न्यायाधीश वर्ग-२ एस. टी. डोके, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. एस. जहागीरदार, सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एस. बी. काळे, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर एस. डब्ल्यू. उगले, तिसरे सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर एम. एस. कोचर, सह दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर पी. एन. गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश आर. जी. वाघमारे, जे. बी. देवरे यांची भाषणे झाली. सूत्रसंचालन अ‍ॅड. आदिबा शेख यांनी, तर आभार प्रदर्शन अ‍ॅड. सोनाली राणा यांनी केले. याप्रसंगी निफाड तालुका विधी व न्याय सेवा समितीचे समन्वयक वाय. पी. मवाळ, निफाड वकीलसंघाचे पदाधिकारी इतर वकील सदस्य, पक्षकार व न्यायालयीन कर्मचारी आदी उपस्थित होते.


मराठी भाषा वाढावी, रु जावी, फुलावी यासाठी कुटुंब, शाळा, समाज, शासन या सर्व घटकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मराठी भाषेची समृद्धी ही ग्रंथनिर्मिती, शब्द संख्या, शब्दसौंदर्य शब्दभांडार यावर अवलंबून आहे.यासाठी आपण विद्यार्थ्यांना वाचनाच गोडी लावण्यची गरज आहे़ मराठी भाषचे व्याकरण विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागणार आहेत़
- प्रा. रशीद पठाण.

 

Web Title: Fortnightly Marathi language enrichment in Niphad court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.