शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 01:35 IST

शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

नाशिक : शिवसेनेचे नाशिकमधील पहिले खासदार आणि माजी जिल्हाप्रमुख राजाभाऊ तथा राजाराम परशराम गोडसे यांचे मूत्रपिंड विकाराने शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी पंचवटीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.  गेल्या पंधरा दिवसांपासून ते पंचवटीतील एका खासगी रुग्णालयात दाखल होते. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने अनेक शिवसैनिक भेटीदेखील घेत होते. शुक्रवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शेकडो शिवसैनिकांनी रुग्णालयात धाव घेतली. शनिवारी (दि. १८) सकाळी संसरी येथील त्यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. गोडसे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, नातंवडे असा परिवार आहे.सायंकाळी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लामरोडवरील देवळाली हॉस्पिटल येथे ठेवण्यात आले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, माजी खासदार समीर भुजबळ यांच्यासह अन्य अनेक मान्यवरांनी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती.  मध्यंतरी काही काळासाठी महाराष्टÑ नवनिर्माण सेनेत गेलेले राजाभाऊ गोडसे हे कट्टर शिवसैनिक असल्याने पुन्हा स्वगृही परतले. शिवसेनाचा आक्रमक आणि ग्रामीण बाज असलेला चेहेरा ही त्यांची ओळख होती. संसरी गावात पहिलवान म्हणून त्यांनी ओळख होती. त्यांचे चुलते अंबादास गोडसे हे कट्टर शिवसैनिक होते. त्यामुळे त्यांना राजकारणाचे शिवसेनेचे बाळकडू मिळाले. शिवसेनेत त्यांनी प्रवेश केल्यानंतर देवळाली कॅम्प सेनेपासून त्यांनी कार्यास प्रारंभ केला. सुरूवातीला देवळाली कॅम्पचे शहर प्रमुख म्हणून त्यांनी काम केले. त्यानंतर संसरी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून ते निवडून आले. शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागात शिवसेना शाखा सुरू करण्याचा धडका त्यांनी लावला. त्यांचे संघटन कौशल्य बघून शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली. त्याकाळात संघटनेवर त्यांची पकड मजबुत झाली आणि तब्बल १२ वर्षे शिवसेना जिल्हा प्रमुखपदाची कारकिर्द त्यांनी गाजवली. एकलहरा गटातून ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून ते निवडून आले होते.  शिवसेनेचे ते जिल्हा प्रमुख असतानाच त्यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये शिवसेनेचे चौथे महाअधिवेशन १९९४ मध्ये झाले आणि ते सत्तेकडे नेणारे ठरले. दार उघड बये दार उघड असे साकडे त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी घातले आणि त्यानंतरच १९९४-९५ मध्ये राज्यात शिवसेना भाजपा युतीची सत्ता आली. त्यांच्या यशस्वी संयोजनामुळेच त्यांना १९९६ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी दिली आणि नाशिक मतदार संघात (कै.) डॉ. वसंत पवार यांच्यासारख्या उमेदवाराला पराभूत करून गोडसे निवडून आले होते. संसरीसारख्या छोट्या गावातून त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाल्याने त्यांचा तळागाळातल्या जनतेशी संबंध होता. खासदार असताना त्यांनी लोकसभा मतदारसंघातील अनेक समस्या मांडल्या. अवघ्या अडीच वर्षांची कारकिर्दीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या काळात शिवसेनेने सहकार क्षेत्रासह अनेक ठिकाणी सत्ता आणली. त्यामुळे त्यांची कारकिर्दीत शिवसेनेचे यशाचे शिखर गाठले होते.संसरी ते संसद हे त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीवर पुस्तकही लिहिले. खासदार असताना त्यांना संसदेच्या संरक्षण समितीवर कामदेखील केले होते. शिवसेनाप्रमुख (कै.) बाळासाहेब ठाकरे यांचा त्यांच्यावर विशेष स्नेह होता. मॉसाहेब मीनताई ठाकरे यांनी तर त्यांना मानसपुत्र मानले होते.

टॅग्स :Deathमृत्यू