शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ रस्त्याचे श्रेय  माजी आमदारांनी लाटू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:43 IST

निफाड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी १०२ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यात पिंपळगाव-चिंचखेड चौफुली ते पिंपळगाव बाजार समिती या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी १५ कोटी रु पये मंजूर झाले असून, त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर करीत असल्याची टीका निफाड पंचायत समितीचे गटनेते राजेश पाटील यांनी केली आहे.

ओझर : निफाड विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसह विविध विकासकामांसाठी १०२ कोटी रुपयांपेक्षा अधिक निधीची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. यात पिंपळगाव-चिंचखेड चौफुली ते पिंपळगाव बाजार समिती या साडेचार कि.मी. अंतराच्या रस्त्यासाठी १५ कोटी रु पये मंजूर झाले असून, त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर करीत असल्याची टीका निफाड पंचायत समितीचे गटनेते राजेश पाटील यांनी केली आहे. ओझर येथे सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार अनिल कदम यांनी सदर रस्त्यासाठी केलेल्या प्रयत्नांची कागदपत्रेच पुरावा म्हणून प्रसारमाध्यमांकडे सुपुर्द केली यावेळी पाटील म्हणाले की, निफाड तालुक्यातील शेतकºयांना शेतमाल विक्रीसाठी बाजार समितीत न्यावा लागत असल्याने रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. सदर रस्ता कामासाठी आमदार कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे विशेष निधीची मागणी केल्यामुळे अर्थसंकल्पात १५ कोटी रचपयांची तरतुद करण्यात आली. कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती तालुक्यातील पत्रकारांना दिली होती. तरीही केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापायी बनकर श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाटील यांनी सांगितले. बनकर यांचे जर भाजपाच्या मंत्र्यांशी एवढे स्नेहाचे संबंध असतील तर त्यांना तालुक्यात हल्लाबोल आंदोलन करण्याची गरज का पडली, असा सवाल करून माजी आमदारांनी आपले राजकीय वजन पालखेड गटासाठी वापरून तेथे विकास करावा,असाही टोला पाटील यांनी यावेळी लगावला. 

टॅग्स :MLAआमदार