शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

न्यायडोंगरीत माजी आमदार आहेरांचे पॅनल विजयी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 01:29 IST

नांदगाव : भावाभावातला संघर्ष राजकीय क्षेत्राला परिचित असल्याने, शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय तणाव असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तापालट होऊन माजी आमदार अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलने बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर यांच्या पॅनलचा पराभव करत विजयश्री खेचून आणली.

ठळक मुद्देपराभवाचे उट्टे काढले : शिवसेनेचे पॅनल पराभूत

नांदगाव : भावाभावातला संघर्ष राजकीय क्षेत्राला परिचित असल्याने, शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय तणाव असलेल्या न्यायडोंगरी ग्रामपंचायतीमध्ये सत्तापालट होऊन माजी आमदार अनिल आहेर यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या पॅनलने बाजार समितीचे माजी सभापती विलास आहेर यांच्या पॅनलचा पराभव करत विजयश्री खेचून आणली. याआधीच्या पंचवार्षिकमध्ये शिवसैनिकांनी अनिल आहेरांची ७० वर्षांची सत्ता संपुष्टात आणून सत्ता विजय नोंदविला होता. त्यामुळे गेल्या वेळच्या पराभवाचे उट्टे काढण्यात आहेर यशस्वी झाले आहेत.

अनिल आहेर यांच्या पॅनलला १२, त्यांचे चुलतभाऊ विलास आहेर यांच्या पॅनलला २ व इतरांना ३ जागा मिळाल्या आहेत. विलास आहेर व शशिकांत मोरे या शिवसेनेच्या नेत्यांमधील ईर्ष्या मतांची विभागणीस कारणीभूत झाली. त्याचा फायदा अनिल आहेर यांना मिळाला. तसेच कोरोना काळातली मदत अनिल आहेरांच्या पथ्यावर पडली. दोन्ही पॅनलने १७ पैकी १४ जागांवर निवडणूक लढवली होती. तीन जागा बहुल वंजारी, आदिवासी वस्ती असलेल्या तांड्यात आपापसात लढल्या गेल्या. या जागा ह्यखर्चिकह्ण असल्याकारणाने त्या ठिकाणी पॅनलने उमेदवार उभे केले नव्हते, असे बोलले जाते. साकोऱ्यात दोन्ही गट बहुमतापासून दूरदुसरे राजकीयदृष्ट्या जागरूक गाव म्हणजे साकोरे या ठिकाणच्या लढती अत्यंत अटीतटीच्या झाल्या. बोरसे आडनाव असलेल्या व्यक्तींचे राजकारणातले वर्चस्व हा साकोरे गावचा सत्तेचा विषय असतो. याही वेळी तसेच झाले. बोरसेंचे दोन गट विरोधात लढले. महाविकास आघाडीशी जवळीक असलेलेले महेंद्र बोरसे आठ व शिवसेनेचे रमेश बोरसे सहा जागा मिळाल्याने दोन्ही पॅनल बहुमतापासून दूर राहिले. अतुल बोरसे यांना तीन जागा मिळाल्या.जातेगावी राष्ट्रवादीकडून शिवसेनेला सत्ताजातेगावला १५ जागांपैकी परिवर्तन पॅनलचे विजय पाटील व बंडू पाटील यांना ११ जागा मिळाल्या. शिवसमता पॅनल गुलाब चव्हाण, सुभाष पवार यांना ४ जागांवर समाधान मानावे लागले. येथे सत्त्ता परिवर्तन झाले. राष्ट्रवादीकडून सत्त्ता शिवसेनेकडे गेली.बोलठाणला शिवसेनेला बहुमतबोलठाण येथे १३ पैकी शिवसेनाप्रणित रफीक व अनिल रिंढे यांच्या पॅनलला सात, तर काँग्रेसचे सुभाष नहार यांच्या पॅनलला पाच जागा मिळाल्या आहेत. याआधी एक जागा बिनविरोध निवडून आली आहे. शिवसेनाप्रणित पॅनलला बहुमत मिळाले असले तरी गेली दोन टर्म्स निवडून आल्यावर एकत्र येण्याचा किस्सा यावेळी घडेल का? असा प्रश्न मतदारांच्या मनात आहे. भालूर ग्रामपंचायत भाजपचे दिगंबर निकम यांच्या पॅनलला आठ जागा, काँग्रेसचे विठ्ठल आहेर यांच्या पॅनलला तीन जागा मिळाल्या आहेत. यापूर्वी संमिश्र सत्ता होती.

टॅग्स :Nashikनाशिकgram panchayatग्राम पंचायत