शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माजी मंत्री बबनराव घोलप यांचा उपनेते पदाचा राजीनामा; शिर्डी मतदार संघावरून वाद

By संजय पाठक | Updated: September 10, 2023 16:40 IST

शिवसेना  उद्धव  ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेच्या संपर्कप्रमुख आणि उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

नाशिक - शिवसेना  उद्धव  ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री बबनराव घोलप यांनी शिवसेनेच्या संपर्कप्रमुख आणि उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. देवळाली मतदारसंघातून तब्बल  पंचवीस वर्षे आमदार असलेल्या घोलप यांचे चिरंजीव देखील गेल्या पंचवार्षिक मध्ये आमदार होते शिवसेनेत फूट पडल्यानंतरही घोलप हे ठाकरे गटाची निष्ठावान होते. दरम्यान बबनराव घोलप यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात देण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी कबूल केले होते. मात्र, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना पक्षाने प्रवेश दिल्यामुळे घोलप यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यावेळी वाकचौरे यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिलेला नाही असे सांगण्यात आले होते.

 दोन दिवसांपूर्वी शिर्डीचे संपर्कप्रमुख पद घोलप यांच्याकडून काढून घेऊन त्यांच्याऐवजी ऍड. विलास शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली त्यामुळे घोलप यांना यापदारून दूर केल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे नाराज घोलप यांनी उपनेता पदाचाही राजीनामा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवला आहे. गेली 25 वर्षे आपण पक्षाचे काम निष्ठावान म्हणून केले मात्र मिलिंद नार्वेकर यांनी हस्तक्षेप सुरू केला  उद्धव ठाकरे यांच्या अहमदनगर येथील दौऱ्यात मिलिंद नार्वेकर सतत वाकचौरे यांना पुढे पुढे करत होते अशा प्रकारचे लांगुलचालन  आपल्याला जमणार नाही असे यासंदर्भात घोलप यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक