शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व प्रभाग सभापतिपदी नव्या चेहऱ्यांना संधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:57 IST

महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने सलग दुसºया वर्षीही भाजपचाच सभापती विराजमान होणार आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी नव्या चेहºयांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

संजय शहाणे ।इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपचे पूर्ण बहुमत असल्याने सलग दुसºया वर्षीही भाजपचाच सभापती विराजमान होणार आहे. दरम्यान, सभापतिपदासाठी नव्या चेहºयांना संधी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्व विभागामध्ये प्रभाग क्र मांक १४, १५, १६, २३ आणि ३० या पाच प्रभागांचा समावेश आहे. पूर्व विभागातील एकूण १९ नगरसेवकांपैकी भाजप- १२, राष्ट्रवादी कॉँग्रेस- ४, काँग्रेस- २ व अपक्ष- १ असे पक्षीय बलाबल आहे. या विभागात शिवसेना व मनसेचा एकही सदस्य नाही. भाजप नगरसेवकांमध्ये विद्यमान सभापती शाहीन मिर्झा, सलग पाचव्यांदा निवडून आलेले माजी उपमहापौर सतीश कुलकर्णी, सलग दुसºयांदा निवडून आलेले सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी व अर्चना थोरात, चौथ्यांदा निवडून आलेले चंद्रकांत खोडे, दुसºयांदा निवडून आलेले अनिल ताजनपुरे यांच्यासह विद्यमान उपमहापौर प्रथमेश गिते, सुप्रिया खोडे, अ‍ॅड. श्याम बडोदे, सुमन भालेराव, रूपाली निकुळे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून सुफियान जीन, समिना मेमन, शोभा साबळे व सुषमा पगारे हे चार नगरसेवक निवडून आलेले आहेत तर काँग्रेसचे राहुल दिवे व आशा तडवी हे सदस्य आहेत. अपक्ष म्हणून निवडून आलेले सय्यद मुशीर यांनी मनसेचे सहयोगी सदस्यपद स्वीकारले आहे. सभापतिपदासाठी भाजपकडून नव्या चेहºयाला संधी दिली जाण्याची शक्यता असून त्यामध्ये प्रामुख्याने सुमन भालेराव, सुप्रिया खोडे, डॉ. दीपाली कुलकर्णी आणि अर्चना थोरात यांच्या नावाची चर्चा असून, त्यांच्या पैकी कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.शोभेचे पद?मागील वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या भाजपाने सत्तापदांचे वाटपाचे सूत्र ठेवले आहे. सर्वांना पदांची संधी देण्याचे आश्वासन पक्षाच्या पदाधिकाºयांनी दिलेले आहे. मात्र, पहिल्याच वर्षी प्रभाग समित्यांसह विषय समित्यांचे सभापतिपद हे निव्वळ शोभेचे ठरल्याने त्याबाबत उत्सुकता कमीच आहे. बºयाच प्रभाग सभा कोरमअभावी चालल्या नाहीत तर विषयांची वानवाही दिसून आली. अधिकारी वर्गाकडूनही या समित्यांना नेहमीच दुय्यम लेखण्यात आले आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका