शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

इंग्रजांमुळे रुजली औपचारिक शिक्षण पद्धती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:36 IST

भारतात कित्येक वर्षे गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी देशातील शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करून येथे औपचारिक शिक्षण पद्धतीला चालना दिली. त्यामुळेच देशात सध्याची औपचारिक शिक्षण पद्धती रुजली असून, त्यापुढील काळात कालांतराने त्यांनी भारतीयांना दिलेल्या औपचारिक शिक्षण पद्धतीमुळेच पुढे या देशात वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने रुजली, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.

ठळक मुद्देकौतिकराव ठाले पाटील : सावानाचे वाङ्मयीन पुरस्कार प्रदान

नाशिक : भारतात कित्येक वर्षे गुरुकुल शिक्षण पद्धती अस्तित्वात होती, परंतु इंग्रज राज्यकर्त्यांनी देशातील शिक्षण पद्धतीत मूलभूत बदल करून येथे औपचारिक शिक्षण पद्धतीला चालना दिली. त्यामुळेच देशात सध्याची औपचारिक शिक्षण पद्धती रुजली असून, त्यापुढील काळात कालांतराने त्यांनी भारतीयांना दिलेल्या औपचारिक शिक्षण पद्धतीमुळेच पुढे या देशात वाचन संस्कृती खऱ्या अर्थाने रुजली, असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी केले.मु. शं. औरंगाबादकर सभागृहात सार्वजनिक वाचनालयाच्या १७९व्या वार्षिक समारंभाला शुक्रवारी (दि.१५) वाङ््मयीन पुरस्कार वितरण सोहळ्याने प्रारंभ झाला.व्यासपीठावर सावानाचे अध्यक्ष प्राचार्य विलास औरंगाबादकर, प्रमुख कार्यवाह श्रीकांत बेणी, क वी किशोर पाठक, नानासाहेब बोरस्ते आदींसह पुरस्कारार्थी उपस्थित होते. ठाले पाटील पुढे म्हणाले, भारतीय इतिहासात गुरुकुलात किंवा आश्रमात पठण पद्धत होती. देशात वाचन संस्कृती ही खऱ्या अर्थाने इंग्रजांच्या शिक्षण पद्धतीमुळे रुजली असून, ग्रंथालये असावीत, अशी विचारधारा आगरकर, टिळक आदींनी आपल्या देशात रुजविल्याचेही ते म्हणाले.सार्वजनिक वाचनालय हे राज्यातील पहिले व देशातील दुसरे जुने वाचनालय असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.अ‍ॅड. अभिजित बगदे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शंकर बोºहाडे यांनी सूत्रसंचालन केले. गिरीश नातू यांनी आभार मानले.कवी विवेक उगलमुगले, प्रा. भास्कर ढोके, डॉ. सुनील कुटे, प्रकाश वैद्य, प्रा. अनंत येवलेकर वप्राचार्य दिलीप धोंडगे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांचाहीगौरव अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.सावानातर्फे लेखक रविराज गंधे यांना डॉ. वि. म. गोगटे (ललितेत्तर ग्रंथ) पुरस्काराने, तर दिनकर कुटे यांना डॉ. अ. वा. वर्टी (कथालेखन) पुरस्कार, डॉ. यशवंत पाटील यांना मु. ब. यंदे (सामाजिक, प्रवास ग्रंथ) पुरस्कार, किरण येले यांना पु. ना. पंडित (लघुकथासंग्रह) पुरस्कार, अभिजित कुलकर्णी यांना धनंजय कुलकर्णी (कादंबरी) पुरस्कार, प्रा. गो. तु. पाटील यांना अशोक देवदत्त टिळक (आत्मचरित्र ) पुरस्कार व हेरंब कुलकर्णी यांना ग. वि. अकोलकर शैक्षणिक, प्रवास ग्रंथ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिकcultureसांस्कृतिक