लोकमत न्यूज नेटवर्ककसबे सुकेणे : शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी चांदवड येथे १ मार्च रोजी होणाºया कांदा परिषदेनिमित्त, रुई, ता. निफाड येथे झालेल्या सभेत केले.मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात नवीन कांद्याची आवक होणार आहे. केंद्र शासनाने कांद्याची निर्यात बंद केली आहे, साठ्यावर मर्यादा घातली आहे. हे निर्बंध उठविले नाहीत तर कांद्याचे दर ५०० रुपये क्विंटलपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. कांद्याचा उत्पादन खर्च दोन हजार रुपये प्रतिक्विंटल आहे. त्याखाली कांदा विकणे शेतकऱ्यांना परवडणार नाही. सरकारने कांद्यावरील निर्बंध न उठविल्यास कांदा उत्पादक शेतकºयांचा तोटा तर होणार आहेच, पण देशाला मिळणारे सरासरी तीन हजार कोटींचे परकीय चलनसुद्धा बुडणार आहे.चांदवड येथील कांदा परिषदेला सर्व शेतकरी संघटना व समविचारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले.या सभेत सीमा नरोडे, अर्जुन बोराडे, शंकरराव पूरकर, सांडूभाई शेख, बाबासाहेब गुजर यांची भाषणे झाली. त्र्यंबक आबाजी चव्हाणके यांनी सूत्रसंचालन केले.
कांदा प्रश्नावर मतभेद विसरून एकत्र या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 00:42 IST
कसबे सुकेणे : शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी चांदवड येथे १ मार्च रोजी होणाºया कांदा परिषदेनिमित्त, रुई, ता. निफाड येथे झालेल्या सभेत केले.
कांदा प्रश्नावर मतभेद विसरून एकत्र या
ठळक मुद्देअनिल घनवट : रु ई येथील सभेत आवाहन