शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

वनविभाग करणार १ कोटी ९२ लाख रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 01:06 IST

५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षलागवडीचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्याला एक कोटी ९२ लाख ३० हजार रोपांचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. याबाबत उपवनसंरक्षक शिवाजीराव फुले यांच्याशी साधलेला संवाद

५० कोटी वृक्षलागवडीचा अखेरचा ३३ कोटी वृक्षलागवडीचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत नाशिक जिल्ह्याला एक कोटी ९२ लाख ३० हजार रोपांचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे. याबाबत उपवनसंरक्षक शिवाजीराव फुले यांच्याशी साधलेला संवादयंदा जिल्ह्याला किती रोपे लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे? त्यानुसार कशी तयारी सुरू आहे?जिल्ह्याला यावर्षी १ कोटी ९२ लाख ३० हजार रोपांच्या लागवडीचे लक्ष्य देण्यात आले आहे. नाशिक पूर्व, पश्चिम वनविभागासह सामाजिक वनीकरण, वनविकास महामंडळासह अन्य सरकारी, निमसरकारी यंत्रणाही सहभागी होणार आहेत. त्यादृष्टीने वनविभागाकडून सामाजिक वनीकरणाच्या रोपवाटिकेतून रोपांचा पुरवठा केला जाणार आहे. जवळपास जिल्ह्यात पूर्व, पश्चिम विभागात तसेच सामाजिक वनीकरणाच्या अखत्यारितीत असलेल्या क्षेत्रात खड्डे खोदण्याचे काम पूर्णत्वास आले आहे. नाशिक पश्चिम विभागाला २६, तर पूर्व विभागाला २८ लाख रोपांच्या लागवडीचे उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.रोपांच्या उपलब्धेबाबत काय सांगाल? सामाजिक वनीकरण, वनविभागाच्या रोपवाटिकांमध्ये रोपेनिर्मिती मागील तीन वर्षांपासून केली जात आहे. रोजगार हमी योजनेतून रोपांच्या निर्मितीला प्राधान्य दिले गेले आहे. यावर्षीदेखील एकूण उद्दिष्ट लक्षात घेता सुमारे ५० लाख रोपे जिल्ह्यासाठी अतिरिक्त तयार आहेत. संपूर्ण जिल्ह्याकरिता वनविभागासह अन्य शासकीय यंत्रणा लक्षात घेऊन सुमारे २ कोटी ४३ लाख रोपे सध्या उपलब्ध आहेत. यामध्ये बहुतांश रोपे ही दीड ते दोन वर्षे वाढ झालेली आहेत.रोपे लागवडीमध्ये कोणत्या प्रकारच्या प्रजातींवर भर दिला जाणार आहे?वनक्षेत्र वाढविण्यासाठी पूरक ठरणाऱ्या अशा भारतीय प्रजातीच्या रोपांची निर्मितीवर भर दिला गेला आहे. यामध्ये प्रामुख्याने हिरडा, बेहडा, आवळा, बांबू, खैर, करंज, कडूनिंब, काशिद, शिवण, कांचन, ताम्हण, उंबर, अर्जुनसादडा, कदंब यांसारख्या विविध प्रजातींचा समावेश आहे.रोपे वाटप प्रक्रियेविषयी थोडक्यात सांगा?जूनअखेरपासून रोपांचे वाटप रोपवाटिकांमधून केले जाणार आहे. ग्रामपंचायती वगळता अन्य सर्व शासकीय, निमशासकीय, सामाजिक संस्थांना शासनाच्या सवलतीच्या दरात रोपे उपलब्ध करून दिली जाणार आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीला तीन हजार २०० रोपांचे कमाल उद्दिष्ट्य देण्यात आले आहे.  त्यानुसार रोपे वाटप केली जातील.५० कोटी वृक्षलागवडीचे अभियान राज्य शासनाकडून सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा अखेरचा ३३ कोटी रोपे लागवडीचा टप्पा यावर्षी पार पडणार आहे. याअंतर्गत जिल्ह्यात ८८ लाख रोपे वनविभाग, ८५ लाख रोपे सामाजिक वनीकरण, ४ लाख ३४ हजार रोपे वनविकास महामंडळ आणि २० लाख ७२ हजार रोपे ग्रामपंचायतींना लागवड करावयाची आहेत. त्यादृष्टीने तयारी अंतिम टप्प्यात सुरू असून, वनविभागाकडून ग्रामपंचायतींना मोफत रोपे पुरविली जाणार आहे.साडेतीन वर्षांत जिल्ह्यात एक कोटी तीन लाख रोपांची लागवडशासनाच्या वृक्षलागवड अभियानांतर्गत २०१६ पासून अद्याप १ कोटी ३ लाख ७ हजार २०० रोपांची लागवड करण्यात आली आहे. त्यापैकी २०१६ साली वनविभागाकडून लावलेल्या रोपांपैकी ७३.३३ टक्के, २०१७ साली ८३.९९ टक्के तर १०१८ साली ९४ टक्के इतके रोपे आॅक्टोबरअखेर जीवंत राहिल्याचा प्रशासनाचा दावा आहे.

टॅग्स :forestजंगलforest departmentवनविभाग