शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

येवल्यात सामाजिक संस्थांकडून गरजूंना अन्नाची पाकिटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 16:58 IST

कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.

येवला : कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे.तहसिलदार रोहिदास वारूळे यांनी शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सामाजिक संस्थाना अन्नदान सहभागाबाबत आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत यातून येवला कांदा व्यापारी असोसिएशन, माणूसकी फॉऊंडेशन व येवला सोशल मिडीया फोरम या तीन संस्थांनी एकत्र येत स्वत: अन्न शिजवून ते पाकीटातून वितरण करण्याची जबाबदारी स्विकारली. यात कांदा व्यापारी असोसिएशनने शिधा बनविण्याचा संपूर्ण खर्च उचलला असून त्यांचेकडील तयार अन्नाची पाकिटे माणूसकी फाऊंडेशन व येवला सोशल मिडीया फोरमचे कार्यकर्ते गरजूंपर्यंत पोहचवित आहेत. सुमारे दोन महिने हा उपक्र म सातत्याने चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अन्न पाकीटे वितरीत करताना राहुल लोणारी, किरणसिंग परदेशी, योगेश सोनवणे, सुभाष गांगुर्डे, तरंग गुजराथी, भूषण शिनकर, अक्षय तांदळे आदी कार्यकर्ते मास्क, हॅन्डग्लोज घालून आपली सुरक्षा व योग्य अंतर राखून कर्तव्य पार पाडीत आहेत. माणूसकी फाऊंडेशनचे अल्केश कासलीवाल, येवला सोशल मिडिया फोरमचे समन्वयक अविनाश शिंदे या उपक्र माचे नियोजन करीत असून नागरिकांकडून या संस्था व पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले जात आहेत.

टॅग्स :NashikनाशिकSocialसामाजिक