शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

अन्न, औषध प्रशासनाची दूध तपासणी मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:43 IST

दूूधभेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.

नाशिक : दूूधभेसळीसंदर्भात आलेल्या तक्रारी तसेच मागील काही दिवसांपासून दुधातील भेसळीचे प्रकार मोठ्या शहरात आढळून आल्यानंतर नाशिक विभागामध्येदेखील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने दूध तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे.ग्राहकांना सुरक्षित दूध उपलब्ध व्हावे, याकरिता अन्न व औषध प्रशासनाकडून नियमितपणे नाशिक विभागामध्ये दूध संकलन केंद्रे, दूध प्रक्रिया केंद्रे, वितरक, किरकोळ विक्रेते अशा सर्व स्तरावर दुधाचे नमुने घेण्याची कार्यवाही केली जाते. दुधाच्या भेसळीचे गांभीर्य लक्षात घेऊन दूध केंद्रे आणि प्रक्रिया केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करण्यात येत आहे. दुधामधील भेसळीस आळा घालण्याच्या दृष्टीने नाशिक विभागामध्ये मागील आठवडाभर दुधाचे नमुने घेणेची विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेमध्ये दूध संकलन केंद्रे व दूधप्रक्रिया केंद्रे यांची तपासणी केली जात असून दुधाचे नमुने घेण्यात येत आहेत.  या मोहिमेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात दूध उत्पादक असलेल्या तालुक्यांमध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे. विभागातील सर्व अन्नसुरक्षा अधिकाºयांनी एकाच दिवशी १७ ठिकाणांहून २९ दुधाचे नमुने तपासणीकरिता घेतले आहेत. ही मोहीम नाशिक विभागातर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात आली असून, विभागात १३१ दुधाचे नमुने घेण्यात आले आहेत. प्रयोगशाळेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अहवालाच्या अनुषंगाने संबंधितांविरुद्ध पुढील कारवाई करण्यात येणार आहे. नाशिक विभागामध्ये मागील वर्षी ३०२ दुधाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी ८४ नमुने कमी दर्जाचे घोषित झाले होते. एकाही नमुन्यात आरोग्यास हानिकारक अशी भेसळ आढळून आली नव्हती. गेल्या दोन वर्षांमध्ये कमी दर्जाच्या ७६ नमुन्या प्रकरणी रुपये १९,४८,००० इतका दंड वसूल करण्यात आला आहे. सहआयुक्त उदय वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त भूषण मोरे, अन्नसुरक्षा अधिकारी विवेक पाटील, किशोर बाविस्कर, सागर नेरकर, ओझरकर, भरत इंगळे यांनी मोहीम राबविली.

टॅग्स :NashikनाशिकFood and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग