शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना पाठोपाठ आता म्युकॉर्मायकॉसीसचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 01:47 IST

कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी देण्यात येणारे स्टुरॉईडस आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकॉर्मायकॉसीस हा बुरशी सारखा आजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांना तो हाेत असून, त्यामुळे अनेकांचे डोळे गमविण्याची  वेळ आली आहे. महापालिकेच्या वतीने त्यास दुजोरा देण्यात आला आहे. अनेक खासगी रुग्णालयात यासंदर्भात रुग्ण दाखल होत असल्याचेदेखील सांगण्यात आले. केवळ डोळेच नव्हे, तर मुत्रपिंड आणि मेंदूवरही आघात होऊ शकतो. 

ठळक मुद्देबुरशीजन्य आजार : शहरात खासगी रुग्णालयात अनेक रुग्ण दाखल

नाशिक : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी देण्यात येणारे स्टुरॉईडस आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकॉर्मायकॉसीस हा बुरशी सारखा आजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. विशेषत: मधुमेह असलेल्या रुग्णांना तो हाेत असून, त्यामुळे अनेकांचे डोळे गमविण्याची  वेळ आली आहे. महापालिकेच्या वतीने त्यास दुजोरा देण्यात आला आहे. अनेक खासगी रुग्णालयात यासंदर्भात रुग्ण दाखल होत असल्याचेदेखील सांगण्यात आले. केवळ डोळेच नव्हे, तर मुत्रपिंड आणि मेंदूवरही आघात होऊ शकतो. नाशिकमध्ये फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. दुसरी लाट इतकी भयंकर आहे की अनेक रुग्णांना ऑक्सिजनचीदेखील गरज भासत आहे. कोरोना रुग्णांची गंभीर अवस्था असेल तर त्यांना वाचविण्यासाठी उपचार करणारे डॉक्टर्स स्टुरॉईडस आणि अन्य टोसीलीझुमॅब इंजेक्शनचा वापर करतात. त्यानंतर हे रुग्ण बरे होत असले तरी नंतर मात्र, अशा औषधांच्या माऱ्यांचा प्रतिकूल परिणामदेखील जाणवत आहे. विशेषत: औषधांच्या माऱ्यामुळे म्युकॉर्मायकॉसीस हा बुरशीजन्य आजार होतो. विशेषत: मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर अशा औषधांच्या डोसचा विपरित परिणाम जाणवत आहे. अनेकांची डोळे, जबडा अशा ठिकाणी बुरशी जन्य आजार होत आहे. या बुरशीचा आघात होत असल्याने डोळे निकामी हाेतात आणि ते काढावेदेखील लागत आहेत. तसेच मुत्रपिंड आणि मेंदूवरदेखील या आजाराचा आघात होऊ शकतो, असे नाशिकमधील जाणकार वैद्यकीय व्यावसायिकांनी सांगितले.साधारणत: उपचाराचे हेवी डोस घेण्यामुळे प्रतिकारशक्ती नाक कोरडे होणे, गाल सुजणे, डोळे लाल होणे किंवा डोळे दुखणे ही या विकारांची मुख्य  लक्षणे आहेत. दिल्लीत या आजाराचे रुग्ण वाढत असून, आरोग्य मंत्रालयानेदेखील चिंता व्यक्त करीत सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकHealthआरोग्य