शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

कांबळी अन् भोसलेंकडूनही ‘कालिदास’बाबत पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:49 IST

राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि राज्य चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीदेखील कालिदास कलामंदिरासंदर्भात नाशिक महापालिकेच्या महापौर आणि मनपा आयुक्तांची भेट घेऊन रंगकर्मींची बाजू मांडली. नियमावलीतील किरकोळ दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

नाशिक : राज्य नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी आणि राज्य चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनीदेखील कालिदास कलामंदिरासंदर्भात नाशिक महापालिकेच्या महापौर आणि मनपा आयुक्तांची भेट घेऊन रंगकर्मींची बाजू मांडली. नियमावलीतील किरकोळ दुरुस्ती त्वरित करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.कालिदास कलामंदिराबाबत ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तमालिकेची दखल घेत नाट्य परिषद आणि चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी असलेल्या राज्यस्तरावरील नेतृत्वानेदेखील महापौर रंजना भानसी आणि नाशिक महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची भेट घेतली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी पंचवटीत सोमवारी झालेल्या एका कार्यक्रमात महापौर भानसी यांची भेट घेऊन नाट्यकर्मींच्या समस्या आणि मागणीबाबत महापौरांना सविस्तर माहिती दिली. तसेच या सर्व समस्यांबाबत एक स्वतंत्र समिती बनवून त्यांच्यामार्फत अहवाल घेऊन त्यातील सूचनांची दखल घेण्याची विनंती केली. त्यावर महापौरांनी येत्या महासभेत त्यावर चर्चा करून आवश्यक ते फेरबदल करीत महासभेची मंजुरी मिळवण्याबाबत आश्वासित केले.मनपाआयुक्त गमे यांची चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी महापालिकेत भेट घेऊन कालिदासच्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली. सर्व रंगकर्मींशी तसेच हौशी आणि व्यावसायिक नाट्यकर्मींशी संवाद साधून ताळमेळ साधत सर्व मागण्यांचा प्राधान्याने विचार करण्याची विनंती केली. त्यावर आयुक्तांनीदेखील सुधारित नियमावलीचा फेरअभ्यास करून त्यात आवश्यक त्या बदलांबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिका