नाशिक : वामनदादा कर्डक जयंतीनिमित्त यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या महाकवी वामनदादा कर्डक अध्यासन आणि नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळ विभागाच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांसाठी लोकगीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १४ आॅगस्ट रोजी विद्यापीठाच्या ज्ञानगंगोत्री मुख्यालयात या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. अंतिम फेरीच्या वेळी सुप्रसिद्ध गायक-संगीतकार नंदेश उमप, मुंबई विद्यापीठाचे डॉ. गणेश चंदनशिवे, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अरु ण जामकर, महापौर यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, शरद शेजवळ उपस्थित राहणार आहेत. पारितोषिके देण्यात येणार आहेत.