शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

लोककला ही इंटरनेटहून प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 01:12 IST

जेथे अजूनही इंटरनेट पोहचत नाही तेथे पिढ्यांपिढ्यांपासून लोककला पोहचलेली असून, या भागात जनजागृती आणि जनचळवळी आणि मनोरंजनासाठी लोकसंवादाचे लोककला हे माध्यम इंटरनेटपेक्षाही अधिक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन लोकगीत गायक तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले.

नाशिक : जेथे अजूनही इंटरनेट पोहचत नाही तेथे पिढ्यांपिढ्यांपासून लोककला पोहचलेली असून, या भागात जनजागृती आणि जनचळवळी आणि मनोरंजनासाठी लोकसंवादाचे लोककला हे माध्यम इंटरनेटपेक्षाही अधिक प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन लोकगीत गायक तथा मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे संचालक डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले.सातपूर औद्योगिक वसाहतीतील नॅबच्या इमारतीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या दोन दिवसीय केंद्रीय युवक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे होते. व्यासपीठावर विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. विजया पाटील, वित्त समिती सदस्य डॉ. संजय खडक्कर, नॅबचे सचिव गोपी मयूर, सहसचिव मुक्तेश्वर मुनशेट्टीवार आदी उपस्थित होते. डॉ. गणेश चंदनशिवे म्हणाले, आपली संस्कृती ही ‘आयटम साँग’ची नसून लोकगीतांची आहे. त्यामुळे पाश्चात्य संस्कृतीच्या आक्रमणात आपल्या मातीतील लोककला, लोकसंस्कृती, मराठी भाषा आणि संस्कृतीचे जतन करण्याची जबाबदारी आपली सर्वांची असल्याचे मत चंदनशिवे यांनी यावेळी व्यक्त केले. त्यांनी ‘नभातुनी आली अप्सरा’ तसेच ‘माझी मैना गावावर राहिली’सारखी चित्रपट व लोकगीते सदर करून युवा महोत्सवात रंग भरला. दरम्यान, अध्यक्षीय भाषणात डॉ. दिनेश भोंडे यांनी आगामी काळात विद्यापीठात ‘नाट्य व लोककला’ विद्याशाखा सुरू करण्याचे सुतोवाच केले. नाशिक विभागीय संचालक प्रा. डॉ. धनंजय माने यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन श्याम पाडेकर यांनी केले. कुलसचिव चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.आज पारितोषिक वितरणकेंद्रीय युवक महोत्सवात विद्यापीठाच्या विविध विभागीय केंद्रावरील साधारण दोनशेहून अधिक विद्याथ़्र्यांनी युवक महोत्सवात एकांकिका, नाटिका, मुकाभिनय, नकला, शास्त्रीय समूह-सुगम व पाश्चात्य गायन, हार्मोनियम, तबला, पखवाज वादन आदी स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या कलाविष्कांराचे सादरीकरण केले. या स्पर्धांचे बक्षीस वितरण रविवारी (दि.२५) होणार असून, या बक्षीस वितरण सोहळ्याने महोत्सवाचा समारोप होणार आहे. दरम्यान, या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांची ‘इंद्रधनुष्य-२०१८’ आंतरविद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

टॅग्स :universityविद्यापीठNashikनाशिक