Fodder, water wandering | चारा, पाण्यासाठी भटकंती
चारा, पाण्यासाठी भटकंती

ठळक मुद्देराजापूर : जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

राजापूर : सध्या उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत चालल्याने गाई व जनावरांना चारा व पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. सध्या दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणावर भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.
चारा शिल्लक नसल्याने गाई व जनावरांना रानोमाळ भटकंती करावी लागते आहे. राजापूर गावात गाई व इतर जनावरांना पाणी पिण्यासाठी गावात हौदाची किंवा रेडीमेड आहळाची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे. सध्या उन्हाळ्याच्या झळा अधिकच तीव्र झाल्या आहेत.
गावातील गाईगुरे सकाळी दररोज चरण्यासाठी जातात किंवा संध्याकाळी घरी येतात तेव्हा ते जनावरांना पिण्यासाठी पाणी नसते त्यामुळे ग्रामीण भागात प्रत्येक गावात जनावरांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत असतात. त्यामुळे हौदाची सोय केल्यास त्यांचा फायदा गावातील गाईगुरे
येताना जाताना तहान भागेल व पूर्वी प्रत्येक गावात आहळाची सोय होती.
गावातील प्रत्येक रहिवासी जनावरांना घेऊन त्या ठिकाणी पाणी पाजण्यासाठी जात असत. त्यामुळे गावात लवकरात लवकर जनावरांना पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.

 


Web Title: Fodder, water wandering
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.