शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या मुलांना उद्योजक बनविण्यावर भर: संतोष मंडलेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:29 IST

नाशिक- उद्योग व्यापारा समोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या घटकांच्या समस्या सोडविण्यात येईल. परंतु त्याच बरोबर शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसायाला जोड म्हणून कृषी प्रक्रिया उद्योग राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर भर राहील, असा मनोदय महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे नवनिर्वाचीत अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केला आहे. नाशिककर असलेल्या संतोष मंडलेचा यांची चेंबरच्या अध्यक्षपदी सलग तिसºयांदा निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

ठळक मुद्देदोन वर्षातील कामांमुळेच मिळाली संधीव्यापारी उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यावर भर

नाशिक- उद्योग व्यापारा समोर अनेक आव्हाने उभी आहेत. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या घटकांच्या समस्या सोडविण्यात येईल. परंतु त्याच बरोबर शेतकऱ्यांना त्यांचा व्यवसायाला जोड म्हणून कृषी प्रक्रिया उद्योग राबविण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर भर राहील, असा मनोदय महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्सचे नवनिर्वाचीत अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी व्यक्त केला आहे. नाशिककर असलेल्या संतोष मंडलेचा यांची चेंबरच्या अध्यक्षपदी सलग तिसºयांदा निवड झाली. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.प्रश्न- महाराष्टÑ चेंबरच्या अध्यक्षपदी सलग तिसºयांचा निवड झाली या विषयी काय वाटते?मंडलेचा: महाराष्टÑ चेंबर आॅफ कॉमर्स अ‍ॅँड इंडस्ट्रीज ही संस्था आहे. त्यामुळे येथे सर्व निर्णय सामंजस्यानेच होतात. ९२ वर्षांनंतर संघटनेची प्रथमच निवडणूक झाली. दोन वर्षाच्या कामगिरीमुळे सभासदांनी मला निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आणि त्यामुळे ही निवडणूक लढविली. सभासदांनीच मला कौल दिल्याने तीस वर्षांनंतर प्रथमच अध्यक्षपदी निवडणून येण्याची हॅट्रीक करू शकलो.प्रश्न- दोन वर्षातील तुमची नेमकी कोणती कामे व्यापारी उद्योजकांना भावली असे वाटते?मंडलेचा- दोन वर्षात अनेक कामे केली. या दोन वर्षातच जीएसटी लागु झाल्याने अनेक अडचणी व्यापारी- उद्योजक बंधूंना अनेक अडचणी आल्या. त्यातून यशस्वी मार्गक्रमण करण्यासाठी प्रयत्न केले. सुरूवातीचा काळ असल्याने या अडचणी होत्या. मात्र नंतर कार्यप्रणाली सुलभ झाली. नोटाबंदीनंतर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तो यशस्वीरीत्या हाताळण्यासाठी चेंबरने काम केले. प्लास्टीक बंदीमुळे देखील व्यापारी वर्ग अडचणीत होते. त्यावरही तोडगा काढला. टर्कीसह अन्य देशांशी चेंबरने सामंजस्य करार केले. अशा अनेक उपक्रमांमुळे सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असे वाटते.

प्रश्न- तुमच्या नव्या टर्म मध्ये चेंबर शेतक-यांसाठी काय करणार आहे.मंडलेचा: शेतीचा प्रश्न गंभीर आहे. शेतमालाला हमी भावाचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना दिलासा द्यायचा असेल तर युवा शेतकºयाला उद्योजक म्हणून घडवण्यासाठी चेंबरच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. कृषी प्रक्रिया उद्योग त्यांनी सुरू केले तर शेतीला मोठा आर्थिक आधार मिळेल. शिवाय अन्य घटकांवरील अवलंबित्व कमी होईल. यामुळे यंदा या विषयावर भर देण्याचा प्रयत्न आहे.मुलाखत- संजय पाठक

टॅग्स :NashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकार