शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

उड्डाणपुलामुळे नवीन वर्षात होणार वाहतूक सुकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:25 IST

नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून,के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यानच्या सुमारे दोन किलोमीटर पेक्षाही अधिक लांबीच्या या पुलाचे काम चालू वर्षी पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसध्या ही कामे ८० टक्के पूर्ण झाली

नाशिक : नाशिक शहरातून जाणाऱ्या मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या विस्तारीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून,के. के. वाघ ते हॉटेल जत्रा दरम्यानच्या सुमारे दोन किलोमीटर पेक्षाही अधिक लांबीच्या या पुलाचे काम चालू वर्षी पूर्ण होऊन हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. याच मार्गावर असलेल्या ओझर व पिंपळगाव बसवंत येथील पुलाचेही काम पूर्णत्वाकडे आले असल्याने नवीन वर्षात राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुकर होणार आहे .नाशिक शहरातून जाणाऱ्या या महामार्गाच्या विस्तारिकरणात गरवारे पॉंईट ते पंचवटीतील के. के. वाघ महाविद्यालय दरम्यान सहा भुयारी मार्ग व प्रकाश पेट्रोल पंपापासून पावणेसहा किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यावरील व समांतर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली असली तरी, के. के. वाघ ते हॉटेल जत्रापर्यंत जागोजागी वाहतुकीची कोंडी तसेच अपघाताचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे उड्डाणपुलाचे विस्तारिकरण करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तयार करून त्यास केंद्र सरकारने मान्यताही दिली होती. कोट्यवधी रूपये खर्चाच्या या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरूवात करण्यात आली. या विस्तारित उड्डाणपुलावर चढण्यासाठी व उतरण्यासाठीही सोय करण्यात आली आहे. सध्या या उड्डाणपुलाचे काम ८० टक्के झाले असून, मुख्य उड्डाणपुलाला तो जोडण्यासाठी पुढच्या महिन्यात वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे. मार्च अखेरीस ठेकेदारास काम पूर्ण करण्याची मुदत असली तरी, कोरोना काळात सहा महिने काम बंद असल्याने आता मे महिन्यापर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे.पाच वर्षे लागली कामालाया विस्तारित उड्डाणपुलाच्या बांधकामाचा शुभारंभ सन २०१६ मध्ये केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यानंतर मात्र कामाचा खोळंबा झाला. उड्डाणपुलाचा नकाशा तयार करण्यापासून ते त्यासाठी निधीची तरतूद व प्रत्यक्ष निविदा प्रसिद्ध होऊन कामाला सुरूवात होण्यातच दोन वर्षाचा कालावधी लोटला व सन २०१९ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली. २०२१ मध्ये हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.राष्ट्रीय महामार्गावरील अडथळे दूरसन २०२० राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीचे अडथळे दूर करणारे वर्ष ठरले. गेल्या पाच ते सहा वर्षापासून ओझर व पिंपळगाव बसवंत येथील ग्रामस्थांकडून महामार्गाच्या विस्तारिकरणासाठी असलेला विरोध काही प्रमाणात मावळला. त्यातूनच ओझरला ४ किलोमीटरचा उड्डाणपूल व पिंपळगाव बसवंत येथे ५०० मीटर व कांदा मार्केट येथे ४०० मीटरचा उड्डाणपूल उभारण्यास मंजुरी मिळाली. सध्या ही कामे ८० टक्के पूर्ण झाली असून, नवीन वर्षात त्यावरून वाहतूक सुरू होईल.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा