अडीचशे कोटी रूपयांच्या खर्चाचे दोन पूल बांधण्यापूर्वीच ठेकेदार कंपन्यांकडून सिमेंटची प्रतवारी बदलण्याची मागणी करण्यात आली. त्या माध्यमातून ४४ कोटी रूपयांचा खर्च वाढणार होता. मात्र सल्लागार संस्था असलेल्या दीपक कुलकर्णी यांनी त्यास विरोध केल्यानंतर हा खर्च वाढणार नसल्याचे स्पष्ट झाले. तथापि, त्यांनतर शिवसेनेचे सुधाकर बडगुजर यांनी पुलासाठी विनानिविदा नियुक्त करण्यात आल्याचा आरोप केला हाेता. त्याचा संदर्भ घेऊन मुकेश शहाणे यांनी या विषयावर कडाडून टीका केली आणि आता पुलाचे काम थांबवणार का असा प्रश्न केला. तर दुसरीकडे बडगुजर यांनी वैयक्तिक वाद बाजूला मात्र विकास कामाला विरोध करू नये असे सांगितले. सलीम शेख यांनी यावेळी सातपूर गाव ते पपया नर्सरीपर्यंत उड्डाणपूल बांधण्याची सूचना केली आहे.
इन्फो...
महापालिकेच्या दोन रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन टाक्या बसवण्याच्या वादग्रस्त विषयाला देखील स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच महापालिकेच्या ऑनलाईन सेवांसाठी ईएसडीएसचे क्लाऊड वापरण्यास मुदतवाढ देण्यातच आल्याचे वृत्त आहे.