शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

पुष्प उत्सव : पुष्परचनेचा कलात्मक अविष्कार; नाशिककरांना पडली भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 19:08 IST

गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली.

ठळक मुद्देकलात्मक पुष्परचनेने नाशिककर पुष्पप्रेमींना मोहिनीप्रदर्शनाचा समारोप रविवारी संध्याकाळी करण्यात आला.नैसर्गिक घटकांचा वापर करत पुष्पसजावट

नाशिक : श्री गणरायाचे साकारलेले रूप... श्री बालाजी देवस्थान, सप्तशृंगी देवी मंदिरासह इस्कॉन मंदिराचा उभारलेला गाभारा...यांसह ग्लोबल वॉर्मिंग, सायकल चळवळ आणि लहान बाळांच्या गोजिरवाण्या रूपाभोवती केलेल्या कलात्मक पुष्परचनेने नाशिककर पुष्पप्रेमींना मोहिनी घातली.निमित्त होते, पुष्परचनाकार अवधुत देशपांडे यांच्या संकल्पनेतून आयोजित पुष्प उत्सव-२०१८चे प्रजासत्ताक दिनाप्रसंगी या पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन विद्या वाचस्पती विवेक घळसासी यांच्या हस्ते करण्यात आले.

गंगापूररोडवरील प्रसाद मंगल कार्यालयात भरविण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनामध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. आकर्षक पद्धतीने एकापेक्षा एक सरस भन्नाट संकल्पनेचा वापर करत केलेल्या पुष्पसजावटीने नाशिककरांना आकर्षित केले.

यावेळी तरुण-तरुणींनी पुष्पसजावटीसोबत सेल्फ काढत सोशल मीडियावर ‘पोस्ट’ही केली. सर्वांसाठी मोफत असलेल्या या प्रदर्शनाला नाशिकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे गावाचा परिसरापासून ते ग्लोबल वॉर्मिंगपर्यंत आणि सायकल चळवळीपासून ते गिटारपर्यंत असे विविध विषय पुष्परचनेच्या माध्यमातून हाताळण्याचा प्रयत्न केल्याचे यावेळी दिसून येते. आकर्षकपणे विविध जातीच्या फुलांचा वापर करत साकारलेल्या प्रतिकृती न्याहाळताना पुष्पप्रेमी हरवून गेले होते. या प्रदर्शनाचा समारोप रविवारी (दि.२८) संध्याकाळी करण्यात आला.पुष्पसजावटीतून ४० संकल्पनांचा मेळवैश्विक तपमानवाढ, त्सुनामी, वैद्यकीय व्यवसाय, हृदयरोग जागृती अशा एकू ण ४० संकल्पनांचा मेळ या पुष्प प्रदर्शनात आपल्या कलेतून देशपांडे यांनी घालण्याचा प्रयत्न केला होता. केवळ नैसर्गिक घटकांचा वापर करत पर्यावरणाला कुठल्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेत पुष्पसजावट करण्यावर त्यांनी भर दिल्याचे दिसून आले. एकूणच या आगळ्या-वेगळ्या पुष्प उत्सवाने नाशिककरांना भुरळ घातली.

टॅग्स :NashikनाशिकNatureनिसर्ग