जायखेडा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावात स्वच्छता राखण्याचे महत्त्वाचे काम करणाºया ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांवर पुष्पवृष्टी करत व त्यांचा सत्कार करत त्यांच्याप्रति ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.जायखेडा ग्रामपंचायतीच्या स्वच्छता कर्मचाºयांच्या समर्पित सेवेची दखल घेत ग्रामपंचायत सदस्य छाया जगताप व अन्य महिलांनी औक्षण करीत पुष्पहार घालून त्यांचा सन्मान केला. कोरोनासारख्या महामारीचा सामना करीत असताना आरोग्य कर्मचारी आपल्या जिवाची पर्वा न करता आपल्या कामाला प्राधान्य देत आपले कर्तव्य निष्ठने चोखपणे बजावत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत जायखेडा येथील हनुमान चौकातील ग्रामपंचायत सदस्य छाया जगताप यांच्यासह आशा अहिरे, सुनीत अहिरे, रोशन अहिर, शोभा जंगम, मनीषा अहिरे, मंगल गुरव, अरुणा जगताप, सोनाली अहिरे, सुमनबाई जगताप, प्रियंका अहिरे, काजल जंगम आदी महिलांनी ग्रामपंचायतीचे स्वच्छता कर्मचारी पोपट जगताप व सागर सोळंकी यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करीत या दोघांचे औक्षण करीत पुष्पहार घालून त्यांच्यावर पुष्पवर्षाव केला. यावेळी निंबा सोनवणे, नरेंद्र खैरनार, सागर अहिरे, स्वप्निल अहिरे, दादा जंगम, आबा महाजन, दिलीप गुरव आदी ग्रामस्थ उपस्थित होते. हनुमान चौकात घंटागाडी येताच अनपेक्षितपणे झालेल्या या सत्काराने हे कर्मचारी भारावून गेले होते.
स्वच्छता कर्मचाऱ्यांवर फुलांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 00:30 IST