शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

जिल्ह्यात आॅक्टोबरअखेरही पूरस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 1:21 AM

जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

नाशिक : जिल्ह्यात आॅक्टोबर-अखेरपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवल्याने सर्व धरणे हाउसफुल्ल झाली असून, धरणांचा धोका टाळण्यासाठी जवळपास तेरा धरणांमधून गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नद्या, नाल्यांना यंदा पहिल्यांदाच आॅक्टोबरमध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. धरणांमधील पाण्याची परिस्थिती पाहता यंदा उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता मावळली आहे.जुलै महिन्यात उशिराने आगमन झालेल्या मान्सूनने नंतरच्या काळात आपली हजेरी कायम ठेवली व यंदा दीडशे टक्क्यांहून अधिक मान्सून बरसला. एवढेच नव्हे, तर सप्टेंबरनंतरही पावसाने आपला मुक्काम वाढवून आॅक्टोबर अखेरपर्यंत जोरदार बरसला. गेल्या तीन ते चार दिवसांपासूनजिल्ह्णात सर्व दूर पाऊस पडत असून, त्यामुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हवामान खात्याने देशातून मान्सून परतल्याचे जाहीर करूनही अवकाळीपावसाने जिल्ह्यात थांबणेच पसंत केले. (पान ७ वर)जिल्ह्यातील धरणे आॅक्टोबरमध्येच फुल्ल(पान १ वरून)परिणामी जिल्ह्णातील लहान, मोठे सर्व धरणे शंभर टक्के भरले आहेत. गेल्या कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याची मुबलकता निर्माण झाली आहे.धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत असल्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला असून, नदी काठच्या गावांमधील विहिरीही काठोकाठ भरल्या आहेत. या पाण्यामुळे यंदा रब्बीचा हंगाम जोमात येण्याची शक्यता असून, त्याचबरोबर दरवर्षी डिसेंबरअखेरपासून जिल्ह्णातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची व रब्बीच्या पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडण्याची होणारी मागणी करण्याची वेळ येणार नसल्याचे दिसू लागले आहे.जिल्ह्णात १५४ टक्केपाऊसयंदा पावसाने तब्बल चार महिने मुक्काम ठोकल्यामुळे आॅक्टोबरअखेर जिल्ह्णात १५४ टक्के पावसाची नोंद सरकारी दप्तरात करण्यात आली आहे. एकट्या आॅक्टोबर महिन्याच्या सरासरीच्या ९६ टक्के पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी आॅक्टोबर अखेर फक्त ८३ टक्के पाऊस नोंदविला गेला होता. यंदा सर्वच तालुक्यांनी सरासरी ओलांडली असून, सर्वाधिक पाऊस नाशिक तालुक्यात १९८ टक्के झाला आहे.जिल्ह्यातील धरणांची एकूण साठवण क्षमता ६५,८१८ दशलक्ष घनफूट इतकी असून, ६५,५३१ दशलक्ष घनफूट पाणी सध्या धरणांमध्ये साठले आहे. त्यामुळे धरणांमध्ये क्षमतेपेक्षा जादा पाणी साठवणे शक्य नसल्याने जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यात प्रामुख्याने गौतमी गोदावरी, पालखेड, पुणेगाव, दारणा, भावली, कडवा, भोजापूर, चणकापूर, हरणबारी, नागासाक्या, गिरणा व माणिकपुंज या धरणांचा समावेश आहे.

टॅग्स :RainपाऊसfloodपूरDamधरण