शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

गोदावरीला पूर : दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत बुडाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2019 20:16 IST

होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी पुढे रामकुंडातून नदीपात्रात प्रवाहित झाले. दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत पूराच्या पाण्यात बुडाली. गंगा गोदावरी मंदिर, बाणेश्वर मंदिरासह निळकंठेश्वर व नारोशंकर मंदिराला पाण्याचा वेढा पडला.

ठळक मुद्देहोळकर पूलाखालून ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत पूराच्या पाण्यात बुडाली.गंगापूर धरणाच्या परिसरात सायंकाळपर्यंत १०२ मि.मी. पावसाची नोंद

नाशिक : गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी (दि.२५) जोरदार पाऊस झाल्यामुळे सायंकाळी सात वाजता गंगापूरमधून गोदावरी नदीत सुमारे १ हजार १४२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे सायंकाळपासून गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होण्यास सुरूवात झाली. शहरासह उपनगरीय भागातून मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी नदीत येऊन मिसळल्याने पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ होऊन होळकर पूलाखालून सुमारे ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी पुढे रामकुंडातून नदीपात्रात प्रवाहित झाले. दुतोंड्या मारूतीची मुर्ती छातीपर्यंत पूराच्या पाण्यात बुडाली. गंगा गोदावरी मंदिर, बाणेश्वर मंदिरासह निळकंठेश्वर व नारोशंकर मंदिराला पाण्याचा वेढा पडला. रामसेतूला पूराचे पाणी लागले.गंगापूर धरणाच्या परिसरात सायंकाळपर्यंत १०२ तर पाणलोट क्षेत्रातील कश्यपी परिसरात ८४ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणलोट क्षेत्रातून पाण्याची आवक होऊ लागल्याने सायंकाळी सात वाजता धरणातून १ हजार १४२ क्यूसेक इतका विसर्ग नदीपात्रात केला गेला. धरणसाठा ५ हजार ६३० दशलक्ष घनफुटापर्यंत पोहचला असून धरण १०० टक्के भरल्यामुळे नदीपात्रात विसर्ग केला जात आहे. तसेच आळंदी धरणातूनही ८६ क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. त्याचप्रमाणे कश्यपीमधून २११ क्यूसेकचा विसर्ग सुरू आहे. गंगापूर धरण शंभर टक्के भरले असून रात्री पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास गंगापूर धरणातून विसर्गामध्ये वाढ होऊ शकते, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. गोदावरी नदीच्या काठालगत असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आला आहे. दुतोंड्या मारुतीची मूर्ती कमरेपर्यंत बुडाली होती. गोदावरी नदीच्या पातळीत वाढ होऊ लागल्याने नदीकाठालगतच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना सायंकाळपासून पंचवटी अग्निशमन उपकेंद्राच्या जवानांकडून दिल्या जात होत्या. रामकुंड ते गाडगे महाराज पुलापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून गस्त घालून ध्वनिक्षेपकांद्वारे नागरिकांना सावधानतेच्या सूचना दिल्या जात आहेत.  त्यामुळे नदीच्या प्रवाहात प्रचंड वेग निर्माण झाला.नासर्डी दुथडी भरून वाहू लागलीसिडको, सातपूर, इंदिरानगर भागात जोरदार पाऊस झाल्यामुळे नंदिनी (नासर्डी) नदीला पूर आला. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास तिडके कॉलनी भागातील मिलिंदनगर येथील पुलावरून नदीच्या पुराचे पाणी वाहू लागले होते. तसेच रात्री आठ वाजेच्या सुमारास वडाळारोडवरील भारतनगर येथील नासर्डीच्या पुलाला पाणी लागले. या भागातील नैसर्गिक नालेदेखील ओसंडून वाहू लागल्याचे चित्र होते. नासर्डी नदीला पूर आल्याने शिवाजीवाडी, भारतनगर, मिलिंदनगर, पखालरोड आदी नदीकाठालगतच्या वसाहतींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

टॅग्स :godavariगोदावरीNashik Floodनाशिक पूरRainपाऊस