वणी : सप्तशृंग गडावर पर्जन्यवृष्टी झाल्याने पर्वतरांगावरील पाण्याचा प्रवाह भातोडे गावातील नदीमार्गे वणीच्या देवनदीला येऊन मिळाल्याने देवनदीला पुर आला आहे. वणी व परिसरात पावसाने हजेरी लावली मात्र सप्तशृंगगड व पर्वतरांगांमधे जोरदार पर्जन्यवृष्टी झाली.हे पाणी पर्वतरांगाच्या तळाला जाऊन भातोडे व लगतच्या नदीपात्रात गेले. हे पाणी देवननदीत गेले. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने कोरडीठाक असलेली देवनदी भरभरु न वाहु लागली आहे. दरम्यान सदरचे पाणी वणी सापुतारा रस्त्यावरील पुलाखालुन वाहु लागले. त्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर गाळ पाण्याबरोबर दिसू लागला. पाण्याच्या प्रवाहामुळे खंडेरावनगरमधील रहिवाशी सतर्क झाले होते.
वणीच्या देवनदीला पुर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 13:47 IST