शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

विश्वशांती धर्म सोहळ्याचे ओझरला ध्वजारोहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2020 00:39 IST

जगद‌्गुरू जनार्दनस्वामी महाराज यांच्या ३१व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी दि. १९ ते २६ डिसेंबर या काळात होणाऱ्या विश्वशांती धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथील बाणेश्वर महादेव आश्रमात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

ठळक मुद्देशांतिगिरी महाराज : भाविकांना सद‌्गुरु कार्याची तळमळ असावी

ओझर टाऊनशिप : जगद‌्गुरू जनार्दनस्वामी महाराज यांच्या ३१व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच कोरोना महामारीच्या समूळ उच्चाटनासाठी दि. १९ ते २६ डिसेंबर या काळात होणाऱ्या विश्वशांती धर्मसोहळ्याचे ध्वजारोहण ओझर येथील बाणेश्वर महादेव आश्रमात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

खासदार डॉ.भारती पवार, भाजप नेते सुनील बागुल, भागवतबाबा बोरस्ते, छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक करण गायकर, निफाड पंचायत समितीच्या सभापती रत्ना संगमनेरे आदींसह अनेक मान्यवरांच्या हस्ते मुख्य धर्मध्वजासह जपानुष्ठान, यज्ञ, अखंड नंदादीप, महिला जप, हस्तलिखित नामजप, नामसंकीर्तनआदी सात धर्मध्वजांचे ध्वजारोहण झाले.

             कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करून ध्वजारोहण सोहळा मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत आणि ऑनलाइन पद्धतीने पार पडला. प्रारंभी आश्रम परिसरात पालखी मिरवणूक, सद‌्गुरुंच्या पादुकांचे पूजन, पालखीपूजन झाले.

भाविकांना मार्गदर्शन करताना शांतिगिरी महाराज म्हणाले, जनार्दनस्वामींसारखे महान सद‌्गुरु आपणा सर्वांना लाभले हे मोठे भाग्य असून, त्यांच्या चरणांची सेवा, त्यांच्या कार्यात सहभागी होण्याची तळमळ हाच खरा भक्तिमार्ग आहे. भाविकांनी सद‌्गुरु कार्यात सेवा मागून घ्यावी. गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविण देव नाही दुजा, पाहता त्रैलोकी हे वाक्य नेहमी स्मरणात ठेवा. गुरुसेवा निष्काम भावनेतून करा. आपल्या मनाला चांगल्या सवयी लावा. चित्त शुद्ध ठेवा असे त्यांनी सांगितले.

आश्रमाच्या वतीने कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वरसिंधुराचे संचालक राहुल शिंदे यांनी भक्तिगीते सादर केली. ‘ओम जनार्दनाय नमः’ या महामंत्राचा जप यावेळी करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रमShantigiri Maharajशांतिगिरी महाराज